‘Bigg Boss Marathi 3’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:16 PM2021-10-11T21:16:55+5:302021-10-11T21:20:16+5:30

Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी’चे दोन्ही सीझन धम्माल गाजले. आता या शोचा तिसरा सीझनही तितकाचं गाजतोय. शो लोकप्रिय होण्यामागं एका व्यक्तिचं मोठ्ठ योगदान आहे. ती व्यक्ती म्हणजे, बिग बॉस मराठीचे होस्ट अर्थात महेश मांजरेकर...

Bigg Boss Marathi 3 mahesh manjrekar charges 25 lakh rupees for one episode of show | ‘Bigg Boss Marathi 3’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

‘Bigg Boss Marathi 3’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

Next
ठळक मुद्देअलीकडेच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रकिया पार पडली आणि कॅन्सरला हरवून महेश मांजरेकर कामावर परतले. शस्त्रक्रियेतून उठल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ‘बिग बॉस मराठी 3’चे प्रोमो शूट केले होते.

बिग बॉस मराठी’चे दोन्ही सीझन धम्माल गाजले. आता या शोचा तिसरा सीझनही तितकाचं गाजतोय. शो सुरू होऊन काही आठवडे होत नाही तोच याची जोरदार चर्चा आहे. अगदी टीआरपीच्या यादीतही ‘बिग बॉस मराठी 3’ (Bigg Boss Marathi 3) वरचढ ठरतोय. लोकप्रिय स्पर्धक, त्यांच्यातील रोज बदलणारी समीकरण, एकापेक्षा एक भारी टास्क हे शो लोकप्रिय होण्यामागचं कारण आहे. याशिवाय शो लोकप्रिय होण्यामागं आणखी एका व्यक्तिचं मोठ्ठ योगदान आहे. ती व्यक्ती म्हणजे, बिग बॉस मराठीचे होस्ट अर्थात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). चावडीवरची त्यांची शाळा म्हणजे, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी. कधी स्पर्धकांवरची आगपाखड, कधी हसत हसत त्यांना दिलेली दाद, कधी हळूच काढलेले चिमटे हे सर्व प्रेक्षकांना भावतं. इतकं की आता महेश मांजरेकरांशिवाय बिग बॉस मराठीची कल्पनाही प्रेक्षकांना करवत नाही. अर्थात यासाठी मांजरेकर मोठी किंमतही वसूल करतात. दोन दिवसांच्या एपिसोडसाठी तगडं मानधन घेतात. किती तर? तर प्रत्येक एपिसोडसाठी दोन आकडी. रिपोर्टनुसार, बिग बॉस मराठीच्या एका भागासाठी मांजरेकर 25 लाख रूपये इतकं मानधन घेतात. आठवड्याच्या दोन एपिसोडमध्ये मांजरेकर हजेरी लावतात. म्हणजे या दोन एपिसोडसाठी दर आठवड्याला ते एकूण 50 लाख रूपये मानधन स्वीकारतात.
निश्चितपणे मांजरेकरांचं हे मानधन बिग बॉस हिंदीचा होस्ट सलमान खानच्या मानधनापेक्षा खूप कमी आहे. सलमान खान सध्या ‘बिग बॉस 15’च्या एका एपिसोडसाठी कोट्यवधी रूपयांचं मानधन घेतोय.

प्रोमो शूट करताना वेदनेने विव्हळत होतो...
अलीकडेच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रकिया पार पडली आणि कॅन्सरला हरवून महेश मांजरेकर कामावर परतले. शस्त्रक्रियेतून उठल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ‘बिग बॉस मराठी 3’चे प्रोमो शूट केले होते. ‘बिग बॉस मराठी 3’च्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकर यांनी प्रोमो शूट करतानाचा हा अनुभव सांगितला होता. ‘बिग बॉस मराठी 3चा पहिला प्रोमो शूट झाला, तो दिवस कदाचित मी कधीच विसरू शकणार नाही. प्रोमो शूट करताना मला असह्य वेदना होत होत्या. शरीरभर वेदना होत्या. शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. या नळ्या कॅमे-यात कुठेही दिसू नये, यासाठी नाही नाही प्रयत्न सुरू होते. पण शूट पूर्ण करायचेच ही एक जिद्द होती. मी अस्वस्थ होतो, वेदनांनी विव्हळत होतो. पण चेह-यावर हे काहीही न दिसू देता मी जिद्दीने शूटींग पूर्ण केले. यानंतर लोकांना बिग बॉस मराठी 3चे प्रोमो आवडले, याचा आनंद मोठा होता, असे ते म्हणाले होते.
 

Web Title: Bigg Boss Marathi 3 mahesh manjrekar charges 25 lakh rupees for one episode of show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app