बिग बॉस मराठी 3 : 'तो त्याच्याच माणसांशी दगाबाजी करतो', उत्कर्षने केले मत व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:33 PM2021-10-18T17:33:50+5:302021-10-18T17:34:15+5:30

Bigg Boss Marathi 3: घरातील सदस्य एकमेकांशी दुसर्‍या ग्रुपबद्दल बोलताना दिसतात.

Bigg Boss Marathi 3: 'He cheats with his own men', Utkarsh expressed his opinion | बिग बॉस मराठी 3 : 'तो त्याच्याच माणसांशी दगाबाजी करतो', उत्कर्षने केले मत व्यक्त

बिग बॉस मराठी 3 : 'तो त्याच्याच माणसांशी दगाबाजी करतो', उत्कर्षने केले मत व्यक्त

Next

घरातील सदस्य एकमेकांशी दुसर्‍या ग्रुपबद्दल बोलताना दिसतात. काही वेळेस ते योजना अखताना दिसतात तर काही वेळेस कसे दुसर्‍या ग्रुपला मात देता येतील याबद्दल चर्चा करताना दिसतात. तर कधी कधी दुसर्‍या सदस्याशी आपलं काय बोलणं झालं हे सांगताना दिसतात. आज जय स्नेहाशी त्याचे काय बोलणे झाले याबद्दल बोलताना दिसणार आहे. या तिघांना नक्की कोणाबद्दल बोलायचे आहे ? स्नेहाने कोणावर विश्वास ठेवायला नको ? घरामध्ये कोण स्नेहाचा फायदा करून घेत आहे? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
 
जय उत्कर्ष आणि मीराशी बोलताना म्हणाला, “मी स्नेहाला क्लियर सांगितले कोणीही तुझ्यासाठी उतरल नसते आणि आतासुद्धा तुला भरपूर लोकं आश्वासन देतील, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन, मी तुझ्यासोबतच आहे पहिल्यापासून वैगरे. जेव्हा रविवार येतो, तशी सिचुएशन येते तेव्हा काय होते मला बघायचे आहे. कारण माझ्यासमोर तर तो मुलगा पडला. जे त्याने सुरेखाताईंनसोबत केले. तो दाखवतो एक आणि करतो एक. उत्कर्षचे म्हणणे पडले तो त्याच्याच माणसाशी तसे करतो. दुसर्‍यांशी केले तर ठीक आहे पण सुरेखाताई त्यांची होती ना ? जय म्हणाला, “मी तिला सांगितले स्वंतत्र खेळ, मीरा सोबत खेळ, माझ्यासोबत खेळ नाही सांगत मी. पण मी तिला हिंट दिली तिकडे जाऊ नको त्या मुलाकडे.  मीरा म्हणाली, “तो तिला शेरनी म्हणून चढवतो हे तिला कळायला हवं”.
हे तिघे विशाल निकमबद्दल तर बोलत नसतील ना? जाणून घेण्यासाठी पहावा लागेल आजचा बिग बॉस मराठी ३चा एपिसोड.

Web Title: Bigg Boss Marathi 3: 'He cheats with his own men', Utkarsh expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app