Bigg Boss Marathi 3 : घरात या गोष्टी नाही केल्या म्हणजे झाले, गायत्री दातारवर फनी मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:38 PM2021-09-25T16:38:07+5:302021-09-25T16:38:42+5:30

बिग बॉस मराठी ३ मध्ये गायत्री दातार कशी खेळी खेळणार याकडेच तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Bigg Boss Marathi 3: Funny memes go viral on Gayatri Datar | Bigg Boss Marathi 3 : घरात या गोष्टी नाही केल्या म्हणजे झाले, गायत्री दातारवर फनी मीम्स व्हायरल

Bigg Boss Marathi 3 : घरात या गोष्टी नाही केल्या म्हणजे झाले, गायत्री दातारवर फनी मीम्स व्हायरल

Next

'तुला पाहते रे' मालिकेतून गायत्री दातार घराघरात पोहचली होती. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. सध्या गायत्री बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये झळकत आहे. या वादग्रस्त समजल्या जाणाऱ्या शोमध्ये गायत्रीदेखील चांगली खेळी खेळत असल्याचे पाहायला मिळते आहे. या शोच्या माध्यमातून  खऱ्या आयुष्यातील गायत्रीचे विविध पैलु रसिकांना अनुभवता येतील. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी गायत्री तिच्या स्टायलिश लूकनेही चाहत्यांना घायाळ करत असते. तिचं हसणंही खूपच फेमस आहे.

सोशल मीडियावर सध्या गायत्रीची वेगळीच चर्चा रंगली आहे.गायत्रीला एका कारणामुळे ट्रोलही केले जाते. ते म्हणजे तिचे हसणं. तिचं हसणं अतिशय कर्कश असल्यामुळे घरात तरी जास्त हसू नकोस अशा कमेट्स चाहते करताना दिसत आहे. फनी मिम्सही व्हायरल होत आहेत.

अभिनय, सौंदर्य, अदा चाहत्यांच्या पंसतीस पात्र ठरत असल्या तरी तिच्या हसण्याची पद्धत मात्र चाहत्यांना अजिबात आवडत नाही. तसेच सोनाली पाटीलने गायत्री दातारची नक्कल करुन दाखवली होती. सोनालीचा अभिनय रसिकांनाही आवडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी सोनाली पाटीलचे कौतुक करताना दिसत आहेत.  

खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप एडव्हेंचरस आहे. तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे. गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे. गायत्रीने अनेक निर्सगरम्य ठिकाणी भेट दिली आहे. त्यातील एक म्हणजे लेह लडाख.

 

तिचे हे सर्व अनुभव तिने तिच्या सोशल मीडियावर फोटोंच्या रूपात शेअर केले होते. खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्ती आणि कॉलेजमध्ये प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी उत्साही मनमौजी अशी गायत्री आहे. गायत्रीचा हा वेगळा पैलू तिच्या चाहत्यांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता. ऑनस्क्रीन साधी सरळ वाटणारी पण ऑफस्क्रीन एडव्हेंचरस गायत्री या दोघींवर प्रेक्षक तितकाच प्रेमाचा वर्षाव करतात.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Funny memes go viral on Gayatri Datar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app