Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Oct: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जंगी सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:12 AM2021-10-15T11:12:02+5:302021-10-15T11:12:32+5:30

Bigg Boss Marathi 3: आज बिग बॉस मराठी रहिवाशी संघातील सदस्यांना मिळणार आहे खास सरप्राईझ.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Oct: Celebration in the house of Bigg Boss Marathi! | Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Oct: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जंगी सेलिब्रेशन!

Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Oct: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जंगी सेलिब्रेशन!

Next

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी आता मनोरंजक वळणावर आला आहे. शो सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात वादविवाद, भांडणे पहायला मिळत आहेत. घरात तीन गटही बनल्याचे पहायला मिळणार आहे. आज बिग बॉस मराठी रहिवाशी संघातील सदस्यांना मिळणार आहे खास सरप्राईझ.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असणार आहे खास सेलिब्रेशन. घरातील सदस्य सुंदर तयार झाले असून धम्माल मस्ती होणार आहे. कारणसुध्दा तसेच आहे “नवरात्री” आज दसराच्या दिवशी बिग बॉस सदस्यांचा हा दिवस खास बनवणार आहेत. वाद विवाद, भांडण, घरात पडलेले गट सगळं विसरून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य एकत्र येऊन या सेलिब्रेशनचा भाग होणार आहेत. आईचा जोगवा मागेन या गाण्यावर महिला सदस्य अप्रतिम नृत्य देखील सादर  करणार आहेत. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची राजगायिक अक्षया अय्यर आणि सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा स्पर्धक विश्वजित बोरवणकर हे त्यांच्या सुरेल आवाजात एकसे बडकर एक गाणी सादर करणार आहेत. सर्व सदस्य मोठया उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये दोन तासाचा विशेष भाग आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर पहायला मिळणार आहे. 

आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एन्ट्री
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीझनमधील नॉमिनेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यात अक्षय वाघमारे याला घरातून काढता पाय घ्यावा लागला. मात्र, अक्षय घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच आदिश वैद्य या स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे.
 

Web Title: Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Oct: Celebration in the house of Bigg Boss Marathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app