Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Sep: कॅप्टनच्या पदासाठी घरात राडा,मीरा आणि जय दोघेही जाणार कोणत्या थराला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:03 PM2021-09-24T14:03:57+5:302021-09-24T14:17:16+5:30

बिग बॉस मराठी ३ आगामी भागात शक्तिपदक जिंकणारा सदस्य एका नव्या अध्यायाशी जोडला जाणार आहे. आता या दोघांमध्ये हे पदक मिळण्यासाठी एक सामना रंगणार आहे.

Bigg Boss Marathi 3, 24 September Episode written update: Jay Dudhane Or Mira Jagannath Who Will be first Captain | Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Sep: कॅप्टनच्या पदासाठी घरात राडा,मीरा आणि जय दोघेही जाणार कोणत्या थराला?

Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Sep: कॅप्टनच्या पदासाठी घरात राडा,मीरा आणि जय दोघेही जाणार कोणत्या थराला?

Next

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यातील उपकार्ये काल संपली.उत्कर्ष शिंदे या पहिल्या साप्ताहिक कार्यातील दोन उपकार्य जिंकून त्याचा पहिला विजेता ठरला. उत्कर्षला विशेष अधिकार देण्यात आला ज्यामध्ये त्याला एका महिला सदस्याची सहविजेतीची निवड करायला सांगण्यात आले होते. त्यानुसार उत्कर्षनेही मीरा जगन्नाथची निवड केली. त्यामुळेच मीरा आणि उत्कर्ष शक्तिपदक मिळविण्याच्या उमेदवारीचे मानकरी ठरले आहेत. 

शक्तिपदक जिंकणारा सदस्य एका नव्या अध्यायाशी जोडला जाणार आहे. आता या दोघांमध्ये हे पदक मिळण्यासाठी एक सामना रंगणार आहे. हे कार्य फक्त टेम्पटेशन रुमसाठी नसून बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील पहिले कॅप्टनपद मिळवण्याच्या बहुमानासाठी देखील असणार आहे. जो सदस्य कार्यात विजेता ठरेल त्या सदस्याला टेम्पटेशन रुम आणि कॅप्टनपद यामध्ये निवड करावी लागणार आहे. कालपासूनच घरामध्ये खेळ फाशाचा सुरु झाला आहे. फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. तेव्हा कोण तिसर्‍या पर्वाचा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवणार ? की टेम्पटेशन रुमची निवड करणार ? हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

बिग बॉसने पहिल्यांदाच सदस्यांना टेम्पटेशन रुमची पहिली झलक दाखवली. या रुममध्ये असणार आहेत सदस्यांसाठी बरीच सरप्राईझेस. टेम्पटेशन रुममध्ये फोनबूथचीही सुविधा देण्यात आली आहे.ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील.

बिग बॉसकडून मिळालेले टास्क कसेही करुन जिंकायचा यावरच प्रत्येक स्पर्धकाचे लक्ष आहे.स्पर्धक आता एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत.घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक प्लॅनिंग करत आहेत.या स्पर्धकांमध्ये मीरा मात्र आता वेगळ्याच विचारात आहे.तिला पूर्ण घराचा ताबा मिळवायचा आहे. यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे.

 
मीरा आणि जयमध्ये जोरदार भांडण होणार आहे. जय म्हणाला संचालिका जर ही जुडो कराटे खेळली तर मी नॅशनल लेवल प्लेयर आहे. मी स्विमिंग पूलमध्ये ढकलतानाही विचार करणार नाही. त्याला विकास शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.होणाऱ्या टास्कमध्ये कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi 3, 24 September Episode written update: Jay Dudhane Or Mira Jagannath Who Will be first Captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app