कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन नुकताच संपला. मात्र या सीझनची चर्चा अद्याप होताना पहायला मिळते आहे. याचं कारण आहे यंदाच्या सीझनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे व अभिनेत्री वीणा जगताप यांचं अफेयर. बिग बॉस मराठी २ च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरु झाला.

बिग बॉस मराठी २ शो संपल्यानंतर आता वीणा व शिव यांची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. कारण वीणाने शिवला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनोखं गिफ्ट दिलं तेही अॅडव्हान्समध्ये.

वीणानं शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढला. तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.


इतकेच नाही तर वीणा शिवच्या आईलादेखील भेटली. त्यांच्या भेटीचा फोटो शिवनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात आता वीणानं त्या दोघांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


वीणानं शिव व तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शिवच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्यावेळचा आहे. त्या दोघांचा फोटो शेअर करत वीणानं म्हटलं की, राधा प्रेम रंगी रंगली.शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.

लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.

आता ते दोघे लग्न करणार का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.


 

 

Web Title: Bigg Boss Marathi 2: Shiva-Veena's romantic photos have made fans crazy, giving comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.