बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि नुकताच हा रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील सदस्य घरांमध्ये हळूहळू सेटल होत आहेत. या सीझनमधील टेलिव्हिजनवर पहायला न मिळालेल्या गोष्टी वूट या अॅपवर 'अनसीन अनदेखा' भाग पहायला मिळणार आहे.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या स्‍पर्धकांपैकी एक आहेत. त्‍या अभिनेता विद्याधर जोशी यांना तमाशा आणि लावणी या नृत्‍यप्रकारांमधील फरक सांगताना पहायला मिळाल्या. सुरेखाजींचा प्रशंसक असल्‍यामुळे विद्याधर म्‍हणतो की, त्‍याला दोन्‍ही नृत्‍य प्रकारांच्‍या फरकाबाबत काहीच माहित नव्‍हते आणि तो दोघांमधील फरक कधीच जाणू शकला नाही.


तो नृत्‍य पाहण्‍याचा पण ते फारसे न आवडण्‍याच्‍या त्‍यांच्‍या अनुभवाबाबत सांगतो. सुरेखाजी त्‍यांची दुविधा दूर करत म्‍हणाल्‍या, ''तो तमाशा असेल. तमाशा आणि लावणी वेगळी असते. त्‍यात तमाशा आणि लावणीमध्‍ये जमीन आस्‍मानाचा फरक आहे.'' असे वाटते की, विद्याधर सुरेखा यांच्‍या स्‍पष्‍टीकरणानंतर लावणी नृत्‍यप्रकाराबाबत भारावून गेले आहेत.


स्‍पर्धक एकमेकांशी ओळख करून घेत असताना पुढील प्रवास किती उत्‍साहवर्धक असेल, हे पाहण्‍याची उत्‍सुकता असेल. 'बिग बॉस मराठी सीझन २'मधील अधिक खास 'अनसीन अनदेखा' क्लिप्‍ससाठी वूट पहा.


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील बऱ्याच विषयांवर चर्चा आणि वाद रंगताना दिसणार आहे. तसेच काल पार पडलेल्या भागामध्ये सदस्यांनी सहमताने चार अपात्र सदस्यांची नावे बिग बॉसना सांगितली. ज्यामध्ये अभिजित बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली माडे आणि शिव ठाकरे यांचा समावेश होता. या प्रक्रियेमध्ये बिग बॉस यांनी चारही सदस्यांना अॅक्टिव्हीटी एरियामध्ये बोलावले... शिवने त्याच्यासमोर ठेवलेले पाकीट उघडला आणि त्यामध्ये नॉमिनेटेड असे लिहिले होते त्यामुळे शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये थेट नॉमिनेट झाला, तर मैथिलीच्या पाकिटामध्ये काहीही लिहिलेले नसल्याने ती बिग बॉसच्या घरामध्ये राहाण्यास पात्र ठरली. तर वैशाली आणि अभिजित यांना नशिबाने साथ दिली कि नाही हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.


Web Title: Bigg Boss Marathi 2: this member has fallen in love with Surekha Punekar's Lavani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.