बिग बॉसच्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या हिना पांचाळला आता बॉलिवूड खुणावत असलं तरी तिला रिएलिटी शोमध्ये रस असल्याचं तिनं सांगितलं आहे. संधी मिळाली तर हिंदी बिग बॉसमध्ये जायला आवडेल असं हिनाने सांगितलं. 

हिनाने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तिथल्या आठवणी व किस्से सांगितलं. हिनाला मलायकाची कॉपी देखील म्हटलं जातं. मात्र आता या शोमुळे लोक मला मलायकाऐवजी हिना पांचाळ म्हणूनच ओळखतील. या घराने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. मी प्रॅक्टिकल व इमोशनल मुलगी आहे. पण, मला घरातून बाहेर पडताना अजिबात वाईट वाटलं नाही. कारण गेम गेम असतो त्यामुळे कोणाला तरी हार मानावी लागते. 


हिनाने पुढे सांगितलं की, मला चित्रपटाच्या व आयटम साँगच्या ऑफर आल्या आहेत. मात्र मी रिएलिटी शोजवर भर देणार आहे. जर हिंदी बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर नक्कीच जाईन. 

मुळची गुजराती असलेल्या हिनाचं बालपण ठाण्यात गेलं आहे. त्यामुळे तिला मराठी समजतं आणि बोलता येतं. हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते.

पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Hina Panchal going to Hindi Big Boss house now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.