ठळक मुद्देपरागने मुक्ता भातखंडेसोबत लग्न केले असून त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आयुष्यात असलेल्या या खास व्यक्तीविषयी सांगितले होते.

बिग बॉस मराठी 2’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमात प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे देखील या कार्यक्रमात स्पर्धकाच्या भूमिकेत दिसला होता. बिग बॉसच्या घरात असताना पराग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. तो या घरात अशताना अभिनेत्री रूपाली भोसलेवर फिदा झाला होता. टीव्हीवर अख्ख्या जगासमोर त्याने रूपालीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. अर्थात रूपालीने कायम पराग हा आपला चांगला मित्र असल्याचे सांगितले होते. आता पराग लग्नबंधनात अडकला असून त्यानेच त्याच्या लग्नाचे, मेहंदीचे आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

परागने मुक्ता भातखंडेसोबत लग्न केले असून त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आयुष्यात असलेल्या या खास व्यक्तीविषयी सांगितले होते. त्याने त्याच्या हळदीचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्याच्या फॅन्सना या गुड न्यूजबाबत कळले होते. तेव्हापासूनच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. सामान्य लोकच नव्हे तर किशोरी शहाणे, सावनी रविंद्र यांसारख्या सेलिब्रेटींनी देखील सोशल मीडियाद्वारे त्याचे अभिनंदन केले होते.  आम्ही लग्नबंधनात अडकलो अशी कॅप्शन देत त्याने त्याचा आणि त्याच्या पत्नीचा फोटो पोस्ट केला होता.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या पराग कान्हेरेला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. पण शो दरम्यान त्याने नेहा शितोळे सोबत केलेल्या वर्तणुकीमुळे त्याला बिग बॉसच्या घरातून जावे लागले होते. यांनतर काही काळ पराग हा लाइमलाईट पासून लांबच होता. पराग हा शेफ असून त्याने या क्षेत्रात त्याचे चांगलेच नाव कमावले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss marathi 2 fame parag kanhere got married PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.