ठळक मुद्दे‘बिग बॉस मराठी’च्या दुस-या पर्वात पराग आणि रूपालीचा रोमान्स पाहायला मिळाला होता.

बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक बिग बॉसच्या घरात अभिनेत्री रूपाली भोसलेवर फिदा होता. टीव्हीवर अख्ख्या जगासमोर त्याने रूपालीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. अर्थात रूपालीने कायम पराग हा आपला चांगला मित्र असल्याचे सांगितले होते. हाच पराग आता नव्याने प्रेमात पडला आहे. होय, मी प्रेमात आहे, असे म्हणत परागने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.
परागच्या आयुष्यातील ही खास व्यक्ति कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तिचे नाव आहे मुक्ता भातखंडे. नुकत्याच पार पडलेल्या व्हॅलेन्टाईन डेला पराग व मुक्ता यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे काही फोटो परागने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘होय, मी प्रेमात आहे. आता सर्व शस्त्र खाली टाकून आयुष्यभरासाठी तुझा होत आहे,’ असे सांगत परागने मुक्ताचे आभारही मानलेत.


बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात पराग कान्हेरेला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती, पण शो दरम्यान त्याने नेहा शितोळे सोबत केलेल्या वर्तणुकीमुळे त्याला मध्यातच शो सोडून जावे लागले होते. यांनतर काही काळ पराग हा लाइमलाईट पासून  लांबच होता. पण व्हॅलेन्टाईन डे ला त्याने ही पोस्ट करताच तो पुन्हा चर्चेत आला.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. यामुळे हा रिअ‍ॅलिटी शो  वादाच्या भोव-यात देखील अडकला होता. विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मयार्दांचे उल्लंघन करणारा असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला  होता. यानंतर दुस-या पर्वात पराग आणि रूपालीचा रोमान्स पाहायला मिळाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss Marathi 2 Fame Parag Kanhere express his love for mukta bhatkhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.