Bigg Boss Marathi 2: Do you know the little girl in this photo?, She is player of Bigg Boss | Bigg Boss Marathi 2: या फोटोतील छोट्या मुलीला ओळखलंत का?, सध्या वावरतेय बिग बॉसच्या घरात
Bigg Boss Marathi 2: या फोटोतील छोट्या मुलीला ओळखलंत का?, सध्या वावरतेय बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना आवडत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आपल्याच आवडत्या स्पर्धकाने या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवावे असे प्रत्येकाला वाटत आहे. 


राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली विणा जगताप आता बिग बॉस मराठी सीजन २ मधून आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घरातील सदस्यांबरोबरचा तिचा वावर असो वा टास्क दरम्यान तिने केलेली मस्ती असो, तिचे चाहते तिला सतत प्रोत्साहित करताना दिसून येतात.

वीणाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत वीणा ओळखता येत नाही. हा फोटो शेअर करून लिहिलं की,छोटे क्षण, मोठ्या आठवणी, आमची छोटी वीणा दिसतेय का सुपर क्युट?

वीणाचा मनमोकळा आणि स्पष्टवक्तेपणा लोकांना आवडत असून, बिग बॉस मराठी सीजन २ मधील तिच्यासोबत घरात असलेल्या स्पर्धकांच्या तुलनेत 'वीणा'चे सोशल नेटवर्किंग वरील फॉलोअर्स कमालीचे वाढत असलेले आपल्याला पहायला मिळते आहे. 


आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये धम्माल मस्ती होणार आहे. नाच, गाणी, सगळे सदस्य मिळून धिंगाणा घालणार हे नक्की ! कारण आज बिग बॉस सदस्यांवर “BB बर्थडे पार्टी” हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये बिचुकलेंचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे. बिचुकले आज “आया है राजा” या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत.

English summary :
Veena Jagtap is now catching the attention of all of us from Bigg Boss Marathi Season 2. A photo of her childhood has been shared on Veena's Instagram account.


Web Title: Bigg Boss Marathi 2: Do you know the little girl in this photo?, She is player of Bigg Boss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.