ठळक मुद्देउद्या 9 सप्टेंबरला शिवचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या काही दिवस आधीच वीणाने शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढून घेत त्याला गोड सरप्राईज दिले होते.

बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचे प्रेम सध्या जोरात आहे.  ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी रंगली. त्यांच्या नात्यावर बरीच टीका झाली.  शो संपल्यानंतर हा रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी बांधला. पण असे काहीच झाले नाही. उलट ‘बिग बॉस मराठी 2’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरु झालाय. होय, आता तर वीणा थेट शिवच्या आईला भेटायला पोहाचली.


होय, नुकताच वीणाने शिवच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतला होता. आता वीणी शिवच्या आईला भेटली. निमित्त होते शिवच्या आईच्या वाढदिवसाचे. शिवच्या आईला भेटून वीणाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यादरम्यानचा एक फोटो शिवने   इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘अखेर राणी माझ्या जिजाऊला भेटली...,’ असे हा फोटो शेअर करताना शिवने लिहिले आहे. 

वीणानेही हाच फोटो शेअर करत, ‘अमूल्य क्षण... वाढदिवसाच्या शुभेच्छा आई...,’ असे लिहिले आहे.
तूर्तास या फोटोंवर चाहत्यांचे एकापेक्षा एक भारी कमेंट्स येत आहेत. ‘आम्हाला वहीणी वीणाच पाहिजे दादा,’ असे शिवच्या एका चाहतीने लिहिले आहे. तर वीणाच्या एका चाहतीने दोघांना ‘मराठी इंडस्ट्रीतील रणवीर-दीपिका’ म्हटले आहे.

उद्या 9 सप्टेंबरला शिवचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या काही दिवस आधीच वीणाने शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढून घेत त्याला गोड सरप्राईज दिले होते. याचे फोटो शिवनेत्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले  होते.

‘आपल्या राणीचे अ‍ॅडव्हान्स बर्थडे गिफ्ट. आईशप्पथ हे तर आभाळाएवढे मोठे गिफ्ट आहे. यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही वीणे,’ असे त्याने लिहिले होते.  


Web Title: bigg boss marathi 2 contestant veena jagtap meet Shiv Thakare mother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.