bigg boss marathi 2 contestant told about there local trains experience | Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी 2 चे स्पर्धक सांगत आहेत, मुंबई लोकल ट्रेन्‍समधील त्‍यांचा अनुभव

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी 2 चे स्पर्धक सांगत आहेत, मुंबई लोकल ट्रेन्‍समधील त्‍यांचा अनुभव

ठळक मुद्देवीणा ट्रेनच्‍या रोजच्‍या स्थितीचे वर्णन करत म्‍हणते, ''लाखो लोक ट्रॅव्‍हल करतात ट्रेनने. तू मला संध्याकाळी सात आणि आठच्‍या मध्‍ये चढूनच दाखव एकटी, धक्‍का मारूनच चढवतील.''

दररोज लाखो लोक मुंबई लोकल ट्रेन्‍समधून प्रवास करतात आणि प्रवासादरम्‍यान त्‍यांना काही विलक्षण अनुभव मिळतात. आपल्‍याला देखील या लोकल्‍सबाबत अनेक कथा ऐकायला मिळाल्‍या असतील, ज्‍यामुळे आपण कधीकधी भारावून जातो आणि तर कधीकधी आपल्‍याला हसायला देखील येते. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये बिग बॉस मराठी 2 मधील स्पर्धक शिव, वीणा, किशोरी आणि शिवानी गप्‍पागोष्‍टी करताना दिसत आहेत आणि शिवानी तिच्‍या धाकट्या बहिणीला ट्रेनमधून कराव्‍या लागणाऱ्या प्रवासाबाबत चिंता व्‍यक्‍त करताना दिसत आहे.  

शिवानी म्‍हणते, ''मी तन्‍वीला अजिबात ट्रेनने ट्रॅव्‍हल करू देत नाही. ती कधीकधी माझ्याकडे येते ठाण्‍याला तर मी तिला ठाण्‍याहून सायनला आणायला जाते आणि परत ड्रॉप देखील करायला जाते आणि जेव्‍हा जेव्‍हा ती ट्रेननी जाते, अजिंक्‍य तिला ट्रेनमध्‍ये बसवतो आणि मगच येतो.'' ती पुढे म्‍हणाली, ''नाहीतर बेस्‍ट वे आम्‍ही तिला कॅब करून देतो. खरे तर एवढे लाड करणे चुकीचे आहे. पण मला काळजी वाटते.'' 

त्‍यानंतर वीणा ट्रेनच्‍या रोजच्‍या स्थितीचे वर्णन करत म्‍हणते, ''लाखो लोक ट्रॅव्‍हल करतात ट्रेनने. तू मला संध्याकाळी सात आणि आठच्‍या मध्‍ये चढूनच दाखव एकटी, धक्‍का मारूनच चढवतील.'' तसेच ट्रेन्‍समधील स्त्रिया जागांसाठी कशाप्रकारे भांडतात ते सांगताना ती म्‍हणते, ''थोडेसे सरका असे म्‍हटलं तर म्‍हणतात 'एक तर मला चौथी सीट मिळाली त्‍यात पण तुला जागा पाहिजे, ये मांडीत बस' पण तरीही ट्रेनमध्‍ये रोज येणाऱ्या लोकांचे एकमेकांसोबत एक वेगळे नाते असते. दसरा, दिवाळी सगळे काही ट्रेनमध्ये सेलिब्रेट करतात.'' 

शिवानी पुढे म्‍हणते, ''पण तुला एक सांगू का, मी कधीच उल्‍हासनगर किंवा बदलापूरची ट्रेन नाही पकडायची, मी नेहमीच कल्‍याण ट्रेन पकडायची डोंबिवलीसाठी. पण काय मज्‍जा यायची माहितेय का, एकदा ठाणे गेलं ना तर तो दिवा आणि डोंबिवलीचा जो पॅच आहे ना, मला भिती वाटायची बाहेर जायला...'' 

पुढे स्‍पर्धक ट्रेन्‍सच्‍या दरवाज्‍यांवर लटकणाऱ्या मुलींबाबत आणि ते त्‍यांच्‍यासाठी किती धोकादायक आहे याबाबत बोलतात. 

Web Title: bigg boss marathi 2 contestant told about there local trains experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.