Bigg Boss Marathi 2: Bichukale court in Bigg Boss House | Bigg Boss Marathi 2 : कोर्टाच्या वाऱ्या करून आलेले बिचुकले आता करणार वकिली
Bigg Boss Marathi 2 : कोर्टाच्या वाऱ्या करून आलेले बिचुकले आता करणार वकिली

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल हीना पांचाळ घराबाहेर पडली. आजपासून नवा आठवडा सुरू होणार आहे. हा नवा आठवडा सदस्यांसाठी कसा असेल ? काय काय टास्क रंगतील ? हे बघणं रंजक असणार आहे. 


बिग बॉस नेहमीच सदस्यांवर वेगवेगळे टास्क सोपवत असतात. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘बिचुकले की अदालत’ हे कार्य रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वकिलची भूमिका निभावणार आहेत. या कार्यात बिचुकले  प्रत्येक सदस्यावर काही आरोप लावतील. अभिजीत बिचुकळे यांनी सदस्यांवर लावलेले आरोप त्यांना फेटाळून लावून त्यांची बाजू मांडायची आहे.


टास्कमध्ये वाद – विवाद तर होणारच... बिचुकले सदस्यांवर कोणकोणते आरोप लावतील ? सदस्य स्वत:ची बाजू काशी मांडतील ? हे बघणं रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा बिचुकले की अदालत आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहेमीच चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे वीणा आणि शीव... घरामध्ये या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. जिथे वीणा तिथे शीव असे सहसा आपल्याला दिसते... महेश मांजरेकरांनी देखील WEEKEND चा डाव मध्ये वीणा याचा कंटाळा येत नाही का? आता खेळाकडे लक्ष द्या असे शीवला सल्ला दिला.


आता यानंतर या आठवड्यामध्ये दोघांमध्ये काही बदल दिसतोय की नाही हा मोठा प्रश्न पडणार आहे. पण आज वीणा आणि शीवमध्ये वाद होणार आहेत... शीवच्या बोलण्याने वीणा दुखावली जाणार असून ती तिच्या भावना किशोरी शहाणे यांच्या जवळ व्यक्त करणार आहे.


Web Title: Bigg Boss Marathi 2: Bichukale court in Bigg Boss House
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.