बिग बॉस 9 सिझनमध्ये प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी झळकले होते. बिग बॉसच्या घरातच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. या शोनंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. युविका चौधरी ही टीव्ही अभिनेत्री असून तिने ओम शांती ओम सारख्या चित्रपटात काम केले होते. प्रिन्सने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. काही वर्षे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांचे पंजाबी पद्धतीने लग्न होणार आहे. त्यांचा साखरपुडा, मेहेंदी समारंभ नुकताच झाला. याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियाला व्हायरल झाले आहेत. 

युविका आणि प्रिन्स त्यांच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे नृत्य पाहून उपस्थित असलेले सगळेच प्रचंड खुश झाले असून त्यांच्यावर ते नोटा उधळताना दिसत आहेत. युविकाने हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला असून फुलांची ज्वेलरी घातली आहे. या मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे तर प्रिन्स पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायझमा मध्ये दिसत आहे. 

प्रिन्स आणि युविकाच्या या आनंदाच्या क्षणी त्यांचे अनेक मित्र मैत्रिणी देखील उपस्थित होते. उतरण या मालिकेतील रश्मी देसाई तसेच किश्वर मर्चन्ट या अभिनेत्रींनी देखील उपस्थित राहून प्रिन्स आणि युविकाला शुभेच्छा दिल्या. किश्वर प्रिन्स आणि युविका सोबत बिग बॉ च्या घरात होती. तेव्हापासूनच प्रिन्स आणि तिची खूप चांगली मैत्री आहे. किश्वरच्या लग्नात तर प्रिन्सने तिला लेहेंगा गिफ्ट म्हणून दिला होता.  

प्रिन्स आणि युविकाने लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केले होते. या फोटोशूटचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत त्या दोघांचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळाला होता. त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूट अल्बमला सोशल मीडियावर रसिकांची पसंती लाभली होती. त्यांचे चाहते, मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव झाला होता. 

 

View this post on Instagram

 

View this post on Instagram

 

 

View this post on Instagram

 

English summary :
Prince Nuru and Yuvika Chaudhari will get married in a Punjabi style. Mehendi & Sangeet Ceremony videos and photos are currently viral on social media. Yuvika Chaudhary is a TV actress who worked in a film like Om Shanti Om.


Web Title: BIgg Boss fame Prince Narula and Yuvika Chaudhary Mehendi ceremony pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.