'बिग बॉस' मराठी या कार्यक्रमामुळे मेघा धाडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मेघा बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली. त्यानंतर ती हिंदी बिग बॉसमध्येदेखील सामील झाली होती. बिग बॉसनंतर मेघा सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली असून ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. नुकताच मेघाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मेघाच्या घरी नवा पाहुणा आल्याचं समजतं आहे.

मेघाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत लाल रंगाची फोर व्हिलर आणि मेघा दिसते आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिलं की, थँक्यू हबी... नवरात्रीच्या निमित्ताने घरी ही लाल रंगाची सुंदरी आणलीस. आई दुर्गादेवीचा आशीर्वाद आहे.


मेघा धाडेने मानसन्मान, एक होती राणी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मेघाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या असल्या तरी तिने कधी माघार घेतली नाही. तिने काहीच वर्षांपूर्वी नव्याने तिच्या आयुष्याला सुरुवात केली. तिने काही वर्षांपूर्वी लग्न केले असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हॉईस प्रेसिडेंट आहेत. मी कधी लग्न करेन असे देखील मला वाटले नव्हते. पण मी लग्न करावे असे माझ्या घरातल्यांना वाटत होते. त्यामुळे मी अरेंज्ड मॅरेज केले असे तिने बिग बॉस मराठीच्या घरात तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितले होते. 


मेघाच्या पतीचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक पंधरा वर्षांचा मुलगा असून त्या मुलासोबत मेघाचे नाते एखाद्या मैत्रिणीसारखे आहे.

तो मेघाला नावानेच हाक मारतो. तिच्या सासरची मंडळी देखील करियरमध्ये तिला खूप सपोर्ट करतात. 


Web Title: 'Bigg Boss' fame Megha Dade's house coming new member, she called to this guest - 'Sundari'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.