छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या माध्यमातून एका रात्रीत लोकप्रियता मिळते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांसाठी बरेच मार्ग खुले होत असल्याचं पहायला मिळालं आहे. तर असेही काही स्पर्धक आहेत ज्यांना या शोचा काहीच फायदा झाला नाही. असे काही कंटेस्टंट आहेत जे बिग बॉसच्या घरात जावूनही आज लाइमलाइटशिवाय जगत आहेत.

रिमी सेन


बिग बॉस सीझन ९मध्ये झळकली होती. रिमीने तिच्या सिनेकारकीर्दीत हंगामा, धूम, बागबान व गोलमालसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तरीदेखील तिला करियरमध्ये हवे तितके यश मिळू शकलेले नाही. त्यानंतर तिने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला पण तिला त्याचा काही फायदा झाला नाही.

मोनिका बेदी


मोनिका बेदी चित्रपटांशिवाय अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली होती. मोनिकाने बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसनंतर मोनिका बऱ्याच मालिकांमध्ये पहायला मिळाली पण त्यानंतर ती गायब झाली. सध्या ती काही इव्हेंट्समध्ये पहायला मिळते.

प्रवेश राणा


मॉडेल व अभिनेता प्रवेश राणाने बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये वाइल्ड कार्डच्या माध्यमातून एन्ट्री केली होती. शोमध्ये क्लाउडियासोबत असलेल्या अफेयरमुळे तो चर्चेत आला होता. २०१६ साली त्याने गर्लफ्रेंड स्कार्लेट विल्सनसोबत लग्न केले. रिपोर्ट्सनुसार तो आता लंडनला शिफ्ट झाला आहे.

अमर उपाध्याय


अभिनेता अमर उपाध्याय मालिका क्योंकी सास भी कभी बहू थी मालिकेत मिहिर या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचला होता. अमर उपाध्यायने छोट्या पडद्यावरून आपल्या करियरची सुरूवात केली होती. तो बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. त्याला एका रात्रीत लोकप्रियता मिळाली होती. मात्र ही लोकप्रियता तो टिकवू शकला नाही.

आकाशदीप


आकाशदीप बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये झळकला होता. आकाशदीप हा सुपरमॉडेल आहे. त्याने १९९९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट प्यार में कभी कभीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आकाशदीपने काही मालिका व एका तमीळ सिनेमात काम केले आहे. तरीदेखील तो सिनेइंडस्ट्रीत हवी तितकी कमाल दाखवू शकला नाही.

जुल्फी सईद


मॉडेल व अभिनेता जुल्फी सईद बिग बॉस २मध्ये झळकला होता. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी जुल्फी चित्रपटात झळकला होता. तेव्हादेखील त्याचा स्ट्रगल सुरूच होता. मालिकेतून त्याला काहीच फायदा झाला नाही. आता तो डीजे व म्युझिशिएन म्हणून काम करतो आहे.

आशुतोष कौशिक


बिग बॉस सीझन २चा विजेता आशुतोष कौशिक ठरला होता. यापूर्वी आशुतोष एमटीव्ही रोडिजचादेखील विनर होता. दोन रिएलिटी शो जिंकल्यानंतर आशुतोष गायब झाला. रिपोर्ट्सनुसार, आशुतोष लाइमलाइटपासून दूर उत्तर प्रदेशमधील सहारनपूर व दिल्लीमध्ये ढाबा चालवतो आहे.

Web Title: Bigg Boss Contestant From All Season Who Missing From Glamorous Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.