Bigg Boss 15: असे काय घडले की विशाल कोटियन आणि तेजस्वी प्रकाशच्या मैत्रीत पडली फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:07 PM2021-10-23T17:07:58+5:302021-10-23T17:08:27+5:30

Bigg Boss 15: आता तेजस्वी प्रकाश आणि विशाल कोटियनच्या मैत्रीत फूट पडताना दिसते आहे.

Bigg Boss 15 Why Tejasswi Prakash And Vishal Kotian Friendship Break | Bigg Boss 15: असे काय घडले की विशाल कोटियन आणि तेजस्वी प्रकाशच्या मैत्रीत पडली फूट

Bigg Boss 15: असे काय घडले की विशाल कोटियन आणि तेजस्वी प्रकाशच्या मैत्रीत पडली फूट

Next

बिग बॉस १५ शोला जेव्हापासून सुरूवात झाली तेव्हापासून काही स्पर्धकांमध्ये वेगळी मैत्री पहायला मिळाली. शोच्या सुरूवातीपासूनच विशाल कोटियन, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली आणि करण कुंद्रा एकत्र मिळून खेळ खेळत होते. मात्र बिग बॉसच्या एका टास्कदरम्यान जसे हे तीन सदस्य घरात गेले. करण कुंद्राने जंगल वासियांची साथ दिली आणि त्यांच्यासोबतचा पुढचा गेम खेळला. मात्र घरात एन्ट्री मिळाल्यानंतर जय आणि विशालच्या नात्यावर परिणाम होत असल्याचे पहायला मिळाले.

आता हळूहळू तेजस्वी प्रकाश आणि विशाल कोटियनच्या मैत्रीत फूट पडताना दिसते आहे. तेजस्वी करण कुंद्राशी बोलताना दिसली की तिने विशाल कोटियनच्या वर्तणुकीबद्दल सांगितले. तेजस्वी म्हणाली की, विशाल  माझ्याकडे सफरचंद घेऊन विचारायला आला की मी खाऊ का. तर मी त्याला नको खाऊस म्हटले. कारण मला वाटत होते की जंगलवासियांना कमी पडत आहे. आपल्याकडे खाण्यासाठी खूप आहे. मला त्यांच्यासाठी वाचवून ठेवायचे होते.

तेजस्वी प्रकाश म्हणाली की, 'इगो झाला हर्ट'
तेजस्वीने करणला पुढे सांगितले की, त्याचा इगो तेव्हापासून दुखावला जेव्हा तुला नंबर १ आणि मला नंबर २ बोलले गेले आणि त्याला तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आले होते. ती पुढे म्हणाली की, कॅमेऱ्यासमोर जाऊन बातचीत केल्यामुळे जर शो जिंकलो असतो तर मी ५० तास तिथेच उभी राहिली असती.

'मला सर्वांसमोर व्हिलन बनवतो आहे'
तेजस्वी पुढे म्हणाली की, आता सर्व मुख्य घरात आले आहेत, तुम्ही जेव्हा घरात आले होते तेव्हा मी म्हटले की हा लक्झरी बजेट आहे. जो आपण कमावून आत आलो होतो. मला माहित नव्हते की तुम्हाला देऊ शकतो की नाही त्यावर मी म्हटले मला वाटले नाही सामायिक करू शकतो. तेव्हा त्याने म्हटले सर्वांना देऊ शकतो त्यावर मी म्हटले की चला आता १३ लोक सर्व गोष्टींचा वापर करणार. तो मला व्हिलन बनवण्याचा प्रयत्न करत आहे की मी सर्वांकडून गोष्टी काढून घेत आहे.

Web Title: Bigg Boss 15 Why Tejasswi Prakash And Vishal Kotian Friendship Break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app