दो दिल मिल रहें है ...! ‘Bigg Boss 15 ’च्या घरात बहरतेय आणखी एक लव्हस्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:38 AM2021-10-19T10:38:17+5:302021-10-19T10:40:30+5:30

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरातील एक जोडी आधीच प्रेमात आकंठ बुडालीये. ती म्हणजे मायशा  व ईशानची. आता कदाचित आणखी एक लव्हस्टोरी घरात बहरताना प्रेक्षक पाहू शकतील.

bigg boss 15 karan kundrra and tejasswi prakash confesses their feelings for each other | दो दिल मिल रहें है ...! ‘Bigg Boss 15 ’च्या घरात बहरतेय आणखी एक लव्हस्टोरी?

दो दिल मिल रहें है ...! ‘Bigg Boss 15 ’च्या घरात बहरतेय आणखी एक लव्हस्टोरी?

Next
ठळक मुद्देकरण कुंद्रा याआधी अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही महिन्यांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं.

बिग बॉस’च्या घरात जादू आहे, असं म्हणतात ते उगाच नाही. ही जादू आपण अनुभवू शकत नाही. पण या घरात राहणारे स्पर्धक याची अनुभूती घेतात. एकाक्षणाला भांडण, दुस-या क्षणाला मैत्री, कधी हसणं, कधी रडणं, कधी प्रेम, कधी खुन्नस असे अनेक रंग बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतात. ‘बिग बॉस 15’चे (Bigg Boss 15 ) बघा. या घरातील एक जोडी आधीच प्रेमात आकंठ बुडालीये. ती म्हणजे मायशा  व ईशानची. आता कदाचित आणखी एक लव्हस्टोरी घरात बहरताना प्रेक्षक पाहू शकतील. होय, दो दिल मिल रहें है मगर चुपके-चुपके..., या गाण्याप्रमाणे करण कुंद्रा (Karan Kundrra)आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे दोघे एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत.

कालच्या एपिसोडमध्ये करण व तेजस्वी एकमेकांसोबत मनातल्या गोष्टी शेअर करताना दिसले. या दोघांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकही चकीत झालेत. ‘मी काही दिवसांपासून तुझ्यापासून दुरावल्याचं वाटतंय. तुझ्याशी बोलणं, तुला भेटणं थोडंस कठीण होतंय. अनेकदा मला यामुळे त्रासही होतो. आपण कधीच एकमेकांशी अशाप्रकारे बोललो नाही. पहिल्यांदा आपण असं बोलतोय. आपल्या दोघांच्या वाईब्स मॅच होतात, असं तू म्हणतोय, तर आपण बोलू शकू,’ असं तेजस्वी करण कुंद्राला म्हणते. करणही तेजस्वीच्या या गोष्टीशी सहमत होतो. ‘मलाही तू आवडते. तू मुख्य घरात गेलीस तेव्हा मी थोडा नाराज झालो होतो. मी तुला खरंच खूप मिस करतोय, हे सांगायला मी बराच वेळ लावला. आपण कधीही बोललो नसू. कारण मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाही,’असं करण तिला म्हणतो.

मी अपसेट असताना तू काहीही करत नाहीस, अशी गोड तक्रार तेजस्वी करते. यावर, जेव्हाकेव्हा वाद होतात, तेव्हा तू ठीक आहेस की नाही, यावर माझं लक्ष असतं. आता मी नेहमी तुझ्यासोबत असेल, असे करण तिला म्हणतो.
रात्रीच्या प्रकाशात तेजस्वी व करण कुंद्राच्या या गप्पा प्रेक्षकांना बरंच काही सांगून गेल्यात. येत्या काही दिवसांत मायशा व ईशानप्रमाणेच करण व तेजस्वीची जोडी चर्चेत आली तर म्हणूनच नवल वाटायला नको. आता ही लव्हस्टोरी बहरते की बहरण्याआधीच कोमजते, ते येणा-या दिवसांत दिसेलच.
तेजस्वी व करण हे बिग बॉस 15 मधील स्ट्रॉग कंटेस्टंट आहेत. करण कुंद्रा याआधी अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही महिन्यांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं.

Web Title: bigg boss 15 karan kundrra and tejasswi prakash confesses their feelings for each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app