‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:11 AM2021-11-26T11:11:58+5:302021-11-26T11:13:08+5:30

Bigg Boss 15 SHOCKING Eviction: सोशल मीडियावर जय भानुशालीच्या (Jay Bhanushali) एक्झिटच्या बातम्या आधीच आल्या होत्या. पण शोमध्ये अचानक एक ट्विस्ट आला...

Bigg Boss 15 Eviction Jay Bhanushali, Vishal Kotian And Neha Bhasin Eliminated After Simba Nagpal | ‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद

‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद

Next

बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) सध्या जणू भूकंप आला आहे. होय, एकीकडे घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत तर दुसरीकडे सिम्बा नागपालनंतर एक नाही तर तीन स्पर्धक घरातून बाद झाले आहेत. गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने या शॉकिंग एव्हिक्शनचे संकेत दिले होतेच. केवळ टॉप 5 घरात राहतील आणि उर्वरित बॉटम 6 मध्ये असलेले सर्व स्पर्धक घराबाहेर जातील, असं सलमान म्हणाला होता. त्यानुसार, बॉटम 6 मध्ये असलेला सिम्बा नागपाल घरातून आऊट झाला आणि पाठोपाठ अन्य तीन स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील प्रवासही संपला.
‘द खबरी’ने दिलेल्या ट्विटनुसार, जय भानुशाली (Jay Bhanushali), विशाल कोटियान (Vishal Kotian)  व नेहा भसीन (Neha Bhasin) हे तिघे बिग बॉसच्या घरातून बाहेर झाले आहेत.


दुसरीकडे मेकर्सनी एक प्रोमो जारी केला आहे. यात हर्ष व भारती बॉटम 5 मधील स्पर्धकांना म्हणजेच राजीव अदातिया, उमर रियाज, जय भानुशाली, विशाल कोटियान व नेहा भसीन यांना एक टास्क देताना दिसत आहेत. या सर्वांना काहीतरी वेगळं करून टॉप 5 स्पर्धक व लाईव्ह आॅडियन्सचं मनोरंजन करायचं आहे. लाईव्ह आॅडियन्स त्यांचा परफॉर्मन्स पाहून वोट देतील. ज्यांना सर्वाधिक कमी वोट्स मिळतील, ते घरातून बाद होतील.
 रिपोर्टनुसार, उमर रियाझ आणि राजीव अदातिया हे दोघे या टास्कचे  विजेते ठरले. 


  
राखी सावंत येतेय..
घरातून चार स्पर्धक बाद झाल्यानंतर आता काही नवे स्पर्धक वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत. ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री करणार आहे. ती तिच्या पतीसोबत बिग बॉसच्या घरात येणार असल्याचीही चर्चा आहे. राखीशिवाय रश्मी देसाई व देवोलिना भट्टाचार्जी या दोघीही घरात एन्ट्री करणार आहेत. रश्मी व देवोलिनासोबत अभिजीत बिचुकले घरात येणार होता. पण घरात येण्याआधीच तो कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे ऐनवेळी त्याच्याजागी राखी सावंतला घरात पाठवण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला.

Web Title: Bigg Boss 15 Eviction Jay Bhanushali, Vishal Kotian And Neha Bhasin Eliminated After Simba Nagpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app