Bigg Boss 15 : विशाल कोटियनने अफसाना खानला केस धरून फरफटलं?  व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 02:20 PM2021-10-20T14:20:29+5:302021-10-20T14:21:53+5:30

Bigg Boss 15 : हे नरकाप्रमाणे घाणेरड आहे. यावर कोणच लक्ष नाही..; काम्या पंजाबी, देवोलिना भट्टाचार्जी संतापल्या...

Bigg Boss 15 did vishal kotian dragged afsana khan by her hair shocking video | Bigg Boss 15 : विशाल कोटियनने अफसाना खानला केस धरून फरफटलं?  व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक्ड

Bigg Boss 15 : विशाल कोटियनने अफसाना खानला केस धरून फरफटलं?  व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक्ड

Next
ठळक मुद्देबिग बॉस 15 च्या दुस-या वीकेंड का वारमध्ये अफसानावरून जोरदार हंगामा झाला होता. तिला पॅनिक अटॅकही आला होता.

बिग बॉस 15’ची (Bigg Boss 15 ) सुरूवातच मुळी ‘तुफानी’ झाली. पहिल्या दिवशीच स्पर्धक एकमेकांशी भिडले आणि आता शो रंगात आला असताना स्पर्धकांमधील भांडणांचा जोर वाढला आहे. जंगलवासी आणि घरवासी यांच्यातील संघर्षही पाहायला मिळतोय.
गेल्या आठवड्यात ‘जहर का कहर’ टास्कदम्यान स्पर्धक आपआपसांत इतके भिडले की अनेकांना इजा झाली. आता टास्कदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत स्पर्धक इतके अ‍ॅग्रेसिव्ह झालेत की, व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झालेत. ज्यांनी कुणी हा व्हिडीओ पाहिला त्यांच्या दाव्यानुसार, विशाल कोटियनने (Vishal Kotian)अफसाना खानचे (Afasana Khan) केस ओढत तिला मागे फरफटतोय. तर अफसाना, जोरजोरात असं करू नकोस म्हणत किंचाळतेय.

अफसाना खानच्या फॅन्स क्लबने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, विशाल अफसानाचे केस ओढत तिला खेचतोय. किती वेदनादायी. पण त्याच्यावर कोणीच आरोप केला नाही. ती (अफसाना) अजिबात सिम्पथी कार्ड खेळत नाहीये,’असं हा व्हिडीओ शेअर करत फॅन्स क्लबने लिहिलं आहे. साहजिकच यानंतर विशाल जबरदस्त ट्रोल होतोय. आता बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंट काम्या पंजाबी आणि देवोलिना भट्टाचार्जी या दोघींनीही हा व्हिडीओ रिट्विट करत विशालला फटकारलं आहे.
‘ओह नो, हे फारच घृणास्पद आहे. यावर कुणाचं लक्ष का गेलं नाही...,’अशी प्रतिक्रिया काम्या पंजाबीनं दिलं.  देवोलिनाने सुद्धा काहीश्ी अशीच प्रतिक्रिया दिली.
बिग बॉस 15 च्या दुस-या वीकेंड का वारमध्ये अफसानावरून जोरदार हंगामा झाला होता. तिला पॅनिक अटॅकही आला होता. तिच्या या वागण्यावरून सलमानने अफसानाची चांगलीच शाळा घतली होती. शमिता शेट्टीवर अफसानाने केलेल्या कमेंट्स सलमानला आवडल्या नव्हत्या. त्यामुळे तो भडकला होता.

Web Title: Bigg Boss 15 did vishal kotian dragged afsana khan by her hair shocking video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app