Bigg Boss 15च्या घरात कोरोनाचा शिरकाव; अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटीव्ह?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:30 PM2021-11-25T14:30:50+5:302021-11-25T14:31:28+5:30

Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नावाचा स्पर्धक येणार म्हटल्यावर सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. पण आता...

Bigg Boss 15: Abhijeet Bichukale Tests Covid-19 Positive | Bigg Boss 15च्या घरात कोरोनाचा शिरकाव; अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटीव्ह?

Bigg Boss 15च्या घरात कोरोनाचा शिरकाव; अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटीव्ह?

Next

बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नावाचा स्पर्धक येणार म्हटल्यावर सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. ‘बिग बॉस मराठी’मध्ये अक्षरश: धुमाकूळ घालणारा बिचुकले ‘बिग बॉस 15’मध्ये काय राडा घालतो, हे पाहायला चाहते उत्सुक होते. बिचुकलेसोबत रश्मी देसाई (Rashmi Desai) आणि देवोलिना भट्टाचार्जी  (Devoleena Bhattacharjee) या दोघीही ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री घेणार होत्या. पण आता ही एन्ट्री लांबल्याचं कळतंय.  होय, ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री घेण्याआधीच बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. यामुळे ऐनवेळी त्याची एन्ट्री रद्द करण्यात आली आहे. शिवाय रश्मी व देवोलिना यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलंय. ‘बिग बॉस 15’च्या मेकर्ससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आधीच टीआरपीच्या शर्यतीत ‘बिग बॉस 15’ पिछाडला आहे. अशात टीआरपी वाढवण्यासाठी मेकर्स वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. वाईल्ड कार्ड एन्ट्री याचाच भाग आहे.

अभिजित बिचुकले हा पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे राहतो. त्यानं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आजवर अनेक स्टंट केले आहेत. स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणा-या अभिजीत बिचुकलेनं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.  अर्थात अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्य त्यानं केलं होतं.  

राखी सावंत येणार?
अभिजीत बिचुकलेची वाईल्ड कार्ड एन्ट्री ऐनवेळी रद्द झाल्यानं  आता त्याच्याजागी ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असल्याची खबर आहे. अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राखी सावंतने एक पोस्ट शेअर करत याचे संकेत दिले आहेत. बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद हिनेही राखीची एन्ट्री कन्फर्म केली आहे. तिने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. राखी सावंत बिग बॉसमध्ये वाइर्ल्ड कार्ड एन्ट्री करतेय, आता मजा येणार, असं तिने लिहिलं आहे.

Web Title: Bigg Boss 15: Abhijeet Bichukale Tests Covid-19 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app