bigg boss 14 Rahul Vaidya once said, 'Hitting A Woman's Ass During Sex' Is OK', Diandra Soares digs his old tweet | राहुल वैद्यने सेक्सबद्दलचे ते जुने ट्वीट व्हायरल, पाहून रागाने लालबुंद झाली ड्राएंड्रा सोरेस

राहुल वैद्यने सेक्सबद्दलचे ते जुने ट्वीट व्हायरल, पाहून रागाने लालबुंद झाली ड्राएंड्रा सोरेस

ठळक मुद्देआज प्रसारित होणा-या बिग बॉस 14 च्या एपिसोडमध्ये रूबीना व राहुल वैद्य यांच्यात जोरदार भांडण होताना दिसणार आहे.

‘बिग बॉस 14’मध्ये राहुल वैद्यची एन्ट्री झाली तेव्हापासून तो चर्चेत आहेत. घरातील प्रत्येक सदस्याशी पंगा घेणाºया याच राहुलने एक अनेक वर्षांपूर्वी केलेले ट्वीट सध्या व्हायरल होतेय. हे ट्वीट पाहून अनेकांनी त्याला खडेबोल सुनावले. बिग बॉसची एक्स-कंटेस्टंट डाएंड्रा सोरेस हिनेही राहुलला फैलावर घेतले.
त्याचे झाले असे की, एका युजरने राहुलचे हे जुने ट्वीट शेअर केले आणि बघता बघता ते व्हायरल झाले. डाएंड्राची नजर या ट्वीटवर गेली आणि ती भडकली. आता राहुलने असे काय ट्वीट केले होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याने सेक्सबद्दल हे ट्वीट केले होते.

‘There's No excuse of hitting a woman, unless you are slapping that ass during sex! , ’ असा आशयाचे ट्वीट राहुलने 2013मध्ये केले होते.


हे ट्वीट पाहून डाएंड्रा चांगलीच संतापली. ‘एखाद्याने त्याला सेक्सपूर्वी थोबाडीत हाणायला हवी,’ अशी कमेंट तिने यावर केली. डाएंटाशिवाय अन्य लोकांनीही राहुलचा क्लास घेतला.

रूबीनासोबत कडाक्याचे भांडण
आज प्रसारित होणा-या बिग बॉस 14 च्या एपिसोडमध्ये रूबीना व राहुल वैद्य यांच्यात जोरदार भांडण होताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो रिलीज झालेय. रूबीना व अभिनवच्या नात्यावर राहुल वैद्य बोलतो आणि रूबीनाचा पारा चढतो. आपल्या मित्रावर रूबीना व अभिनव तुटून पडल्याचे पाहून अली गोनी या भांडणात उडी घेतो.
राहुल हा एक गायक आहे. त्याचे बालपण मुंबईमध्ये गेले. येथेच त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहान असतानाच त्याने विविध संगीतस्पर्धांमध्ये भाग घेतला. मिठीबाई महाविद्यालयात बारावीत शिकत असताना त्याने इंडियन आयडॉल या स्पर्धेत भाग घेतला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 14 Rahul Vaidya once said, 'Hitting A Woman's Ass During Sex' Is OK', Diandra Soares digs his old tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.