Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ठरला निशांत मलकानी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 05:28 PM2020-10-23T17:28:00+5:302020-10-23T17:28:45+5:30

'बिग बॉस 14'च्या घरातून तीनही तूफानी सिनिअर्स घराबाहेर पडले आहे. आता संपूर्ण घराचा ताबा नव्या स्पर्धकांकडे आहे.

Bigg Boss 14: Nishant Malkani became the first captain in the house of Bigg Boss | Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ठरला निशांत मलकानी

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ठरला निशांत मलकानी

googlenewsNext

 'बिग बॉस 14'च्या घरातून तीनही तूफानी सिनिअर्स घराबाहेर पडले आहे. आता संपूर्ण घराचा ताबा नव्या स्पर्धकांकडे आहे. खेळातून बाद झालेले एजाज खान आणि पवित्रा पुनिया 'रेड झोन'मध्ये गेले आहेत. यानंतरच्या पहिल्याच टास्कमध्ये त्या दोघांना संचालकाची भूमिका पार पडायची होती. या दरम्यान पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. तर, या सगळ्या वादांत स्पर्धक निशांत मलकानीने पहिला कॅप्टन होण्याचा मान पटकावला आहे. 

संचालक असलेल्या पवित्रा आणि एजाजमध्ये स्पर्धकांमुळे वाद झाला आहे. एजाजच्या म्हणण्यानुसार रुबिना या टास्कमध्ये सगळ्यात शेवटी बाहेर आली, तर पवित्राच्या म्हणण्यानुसार अभिनव सगळ्यात शेवटी बाहेर आला आहे. भागाच्या सुरुवातीस हा टास्क सुरू करण्यात आला. मात्र, दोन्ही संचालकांच्या वादामुळे खेळ अडकून पडला होता. यानंतर अभिनवने आपणच सगळ्यात शेवटी बाहेर आल्याचे कबूल केले. तरीही एजाज स्वतःच्या मतावर ठाम होता. या गोंधळामुळे शेवटी 'बिग बॉस'ने त्यांना निर्णय घेण्याची ताकीद दिली. यानंतरही त्यांच्यात फरक न पडल्यामुळे अखेर बिग बॉसने या खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. या खेळातून जास्मीन भसीन आणि अभिनव शुक्लाला बाद करण्यात आले.

रुबिना, जान आणि निशांतच्या प्लॅननुसार रुबिना या खेळातून बाहेर गेले आणि ठरल्याप्रमाणे कॅप्टन पद निशांत मलकानीला मिळाले. यानंतर निशांतला घरातील अनेक सुविधा वापरण्याचा अधिकार मिळाला आहे. निशांत कॅप्टन झाल्यानंतर निक्की तांबोळी खूप रडली आणि रेड झोनमध्ये पवित्राकडे गेली. त्यानंतर बिग बॉसने आदेश दिला की ग्रीन झोनमधील कोणताही स्पर्धक रेड झोनमध्ये जाणार नाही. त्यानंतर निक्कीला ग्रीन झोनमध्ये यायला सांगितले.


पुढील भागाची झलक दाखवली गेली आहे. ज्यात निशांत निक्कीला धमकी देतो की जर तिने नियम पाळले नाही तर तिला शिक्षा मिळेल आणि तिचे सामान लॉक केले जाईल. त्यानंतर सामान मॉलमध्ये शिफ्ट करताना दिसले होते. तर दुसरीकडे पर्सनल कमेंट केल्यामुळे पवित्रा राहुल वैद्यसोबत भांडताना दिसली की ती का ही अफवा पसरवत आहे की तिचे अभिनव शुक्लावर क्रश आहे. त्यानंतर पवित्रा पुनिया रडताना दिसली आणि राहुल वैद्य तिला सॉरी बोलण्यासाठी नकार दिला.

Web Title: Bigg Boss 14: Nishant Malkani became the first captain in the house of Bigg Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.