'बिग बॉस 14' चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बिग बॉस 14 चा पहिला एपिसोड 3 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेकर्सनी शोला हीट करण्यासाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. कोरोना व्हायरस मुळे बिग बॉसचा सेट गोरेगावमधल्या फिल्मी सिटीमध्ये तयार करण्यात आला आहे. या शोचा प्रीमियर एपिसोड 1 ऑक्टोबरला सलमान खान शूट करणार हे, पण त्याआधी बिग बॉस 14 च्या घरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

फोटो- Mr Khabri  Instagram 

बिग बॉस 13 हिट झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये 14 व्या सीझनबाबत उत्साह आहे. बिग बॉसच्या घरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  न्यूज 18च्या रिपोर्टनुसार इन्स्टाग्रामवरील  Mr Khabri_official नावाच्या पेजने हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये घराची झलक दिसते आहे. बेडरुम, वॉशरुम, लिव्हिंग रुमचे फोटो यात दिसतायेत. फोटोंमध्ये बेडरुमपासून बाथरुमपर्यंत सगळे काही आलिशान दिसते..

फोटो- Mr Khabri  Instagram 

या घरात कोणकोण जाणार यावर चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नैना सिंग, जास्मीन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजपाल आणि जान कुमार सानू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 3 ऑक्टोबरला हे स्पष्ट होईल यातील कोण-कोण बिग बॉसच्या घरात जाणार.  यावेळी शोमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांना कोविड -19 ची टेस्ट घ्यावी लागणार आहे. 

फोटो- Mr Khabri Instagram 

लमान खानला दिले जाणार 250 कोटी 
बिग बॉस 14चे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमानला 250 कोटी दिले आहेत. सलमान आठवड्यातून एकदा शोच्या दोन भागांसाठी शूटिंग करणार आहे. 12 आठवड्यांसाठी सलमानला प्रत्येक भागासाठी 10.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत.  म्हणजे एका आठवड्यात दोन भागांसाठी सलमानला 20.50 कोटी रुपये मिळतील.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg boss 14 house leaked pics of the bedroom and living room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.