सिद्धार्थ शुक्लाबिग बॉस सीझन १३ चा विजेता ठरला आहे. हा शो संपल्यानंतर तो सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतो आहे. बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याआधी बिग बॉसच्या अकराव्या सीझनची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेनेसिद्धार्थ शुक्लाची एक ऑडिओ क्लीप लीक केली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये ते दोघे फोनवर बोलत आहेत. त्यावेळी शिल्पाने सांगितले की, ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते.


शिल्पाने खुलासा केला होता की, रिलेशनशीपमध्ये असताना सिद्धार्थ नेहमी रागवायचा. कित्येक वेळा मारहाणदेखील केली होती. ती पुढे म्हणाली होती की, आम्ही फॅमिली फ्रेंड होतो. २०१०-११ साली आम्ही एकमेकांना भेटलो होतो. मीदेखील त्या यादीतील एक आहे जिला सिद्धार्थने डेट केले आहे.


शिल्पा पुढे म्हणाली की, सिद्धार्थ सोबत माझे नाते चांगले नव्हते. सिद्धार्थने त्याची पर्सनॅलिटी शोमध्ये दाखवली आहे. रिलेशनशीपमध्ये असताना तो खूप पझेसिव्ह होता. सुरूवातीला ही गोष्ट चांगली वाटते. असं वाटतं की आपल्यावर कुणी इतकं प्रेम करत आहे पण नंतर गोष्टी बिघडू लागतात.


तिने पुढे सांगितले की, कित्येक वेळा मी सिद्धार्थचा फोन उचलू शकत नव्हते.त्यावेळी माझ्याशी तो उलटसुलट बोलायचा. जर मी त्याला उत्तर देऊ शकली नाही तर मला मारायचा. मला शिव्या ऐकाव्या लागत होत्या. इतकंच नाही तर त्याने मला अॅसिड हल्ला करेन अशी धमकीदेखील दिली होती. तो म्हणाला होता की, मला सोडून दाखव तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकेन. तुझी वाट लावून टाकेन.


शिल्पा शिंदे म्हणाली की, सिद्धार्थ रागीटपणा व हिंसक वर्तणूक पाहून मी गप्प बसणाऱ्यातली नव्हते. मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. या नात्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. मी सिद्धार्थच्या आईशीदेखील बोलले होते. त्यांना मी म्हटले होते की, ही गोष्ट पुढे घेऊन जाणार. मी कुणाला घाबरत नाही. थोडीफार लाज वाटत असेल तर सिद्धार्थला हे सगळे थांबवायला सांग.

Web Title: Bigg Boss 13 Shilpa Shinde Reveals Why She Break Up With Sidharth Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.