बिग बॉस १३मध्ये सिद्धार्थ शुक्लावर शहनाज गिलचं असलेलं प्रेम जगजाहीर झालं आहे. शोमध्ये बऱ्याचदा तिने सिद्धार्थवर असलेल्या प्रेमाची कबूली दिली आहे. तसेच त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही भावते आहे आणि सोशल मीडियावर ही जोडी लोकप्रिय आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात शहनाजने सिद्धार्थला लिप किस करताना दिसली आणि तेही तिच्या अंदाजात. मात्र शहनाजचा हा प्रकार पाहून आरती हैराण झाली.

शहनाज गिल बाथरुम एरियामध्ये मेकअप करत असताना सिद्धार्थ त्या ठिकाणी आला. त्यावेळी शहनाज त्याला किस करायला सांगते. यावर सिद्धार्थ तिच्या हातावर किस करतो. शहनाझ त्याला गालावर किस करायला सांगते पण तिच्या चेहऱ्यावर मेकअप असल्यानं सिद्धार्थ तिला फ्लाइंग किस देतो. पण ही गोष्ट शहनाजला आवडत नाही आणि ती त्याला बोलणं बंद करण्याची धमकी देते त्यामुळे सिद्धार्थ तिच्या गालावर किस करतो. त्यानंतर शहनाज त्याला ओठांवर किस करण्यास सांगते मात्र सिद्धार्थ असं करण्यास नकार देतो.


सिद्धार्थ तिला सांगतो की, मला अ‍ॅलर्जी होते त्यामुळे मी करणार नाही आणि माझी आई गावात राहिलेली असल्यानं तिला हे सर्व आवडत नाही. यावर उत्तर देताना शहनाज सांगते की माझी आई सुद्धा गावातली आहे. पण तुम्ही सर्व लिप किसचा चुकीचा अर्थच का घेता. पण यामध्ये आरती सिंग सुद्धा सिद्धार्थची बाजू घेते आणि सांगते की त्यांच्या घरी असं करण नॉर्मल गोष्ट मानली जात नाही.


यानंतर सिद्धार्थ शहनाझला समजावतो की या शोमधून बाहेर पडल्यानंतर आपलं नातं वेगळं असणार आहे. आपण जास्त एकमेकांशी बोलू शकणार नाही आणि आपापल्या लाइफ आणि करिअरमध्ये व्यग्र होणार आहोत.

यानंतर येत्या एपिसोडमध्ये जेव्हा सर्वांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येतात तेव्हा शहनाजचे बाबाही तिला सिद्धार्थ पासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसतात.

Web Title: Bigg Boss 13: Shehnaz Gill Kissed Sidharth Shukla Infront Of Arti Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.