Bigg Boss 13 : शहनाज गिल भडकली, पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून गेली... पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:17 PM2020-02-04T12:17:29+5:302020-02-04T12:18:55+5:30

Bigg Boss 13 : बिग बॉसच्या घरात रंगलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी स्पर्धकांवर प्रश्नांचा भडीमार केला. पण याचदरम्यान असे काही झाले की...

bigg boss 13 shehnaaz gill walks out of press conference | Bigg Boss 13 : शहनाज गिल भडकली, पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून गेली... पाहा व्हिडीओ

Bigg Boss 13 : शहनाज गिल भडकली, पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून गेली... पाहा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल ही जोडी या सीझनमध्ये कमालीची लोकप्रिय झाली.

बिग बॉस 13’ हा वादग्रस्त शो आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. ग्रँड फिनालेआधी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. बिग बॉसच्या घरात रंगलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी स्पर्धकांवर प्रश्नांचा भडीमार केला. पण याचदरम्यान असे काही झाले की, शहनाज चक्क  प्रेन्स कॉन्फरन्स सोडून गेली.
होय, सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत शहनाज  प्रेस कॉन्फरन्स सोडून जाताना दिसतेय.  होय, प्रेस कॉन्फरन्समध्ये सिद्धार्थला एक प्रश्न केला गेला. सिद्धार्थने यावर उत्तर दिले. पण याचदरम्यान असे काही झाले की शहनाज  आपल्या खुर्चीवरून उठून ती तडक प्रेस कॉन्फरन्समधून बाहेर पडली.


सलमानच्या सल्ल्यामुळे तू शहनाजपासून मुद्दाम फटकून राहू लागला आहेस का? असा प्रश्न एक पत्रकार सिद्धार्थला करतो. यावर, आमच्यात कुठलाही दूरावा आलेला नाही, असे सिद्धार्थ म्हणतो सिद्धार्थ बोलत असतानाच, ‘मी कुणासोबत नातं जोडते ते नेहमीसाठी...,’असे शहनाज म्हणते. यानंतर पत्रकार शहनाजला प्रश्न विचारतात.

‘तू फक्त शो जिंकण्यासाठी गेम खेळते आहेस का? सिद्धार्थवरचे तुझे प्रेम निव्वळ देखावा आहे का?,’असा प्रश्न पत्रकार तिला करतात. याचे उत्तर दिल्यानंतर शहनाज पे्रस कॉन्फरस अर्ध्यावर सोडून जाताना दिसते... ती पत्रकारांच्या प्रश्नामुळे भडकून प्रेस कॉन्फरन्स सोडते की यामागे काही वेगळे कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजच्या एपिसोडमध्ये यामागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.


तूर्तास हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल ही जोडी या सीझनमध्ये कमालीची लोकप्रिय झाली. बिग बॉसच्या घरात दोघांचीही जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली.   

Web Title: bigg boss 13 shehnaaz gill walks out of press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.