Bigg Boss 13 Salman Khan Show Shehnaz Kaur Gill Says Siddharth Dey Touches Me At Night | Bigg Boss 13: शहनाजने बेड पार्टनरबाबतचा केला धक्कादायक खुलासा, घरातील झाले हैराण
Bigg Boss 13: शहनाजने बेड पार्टनरबाबतचा केला धक्कादायक खुलासा, घरातील झाले हैराण


बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये स्पर्धकांमधील वादविवाद पहायला मिळत आहेत. यादरम्यान शहनाज कौर गिलने सिद्धार्थ डेबद्दल खुलासा केला जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. शहनाजने मस्करी मस्करीत सिद्धार्थसोबतचा बेड शेअरिंगच्या गोष्टी सांगितल्या. शहनाजने ही गोष्ट आधी सिद्धार्थ शुक्लाला सांगितली आणि नंतर बाथरूम एरियामध्ये उपस्थित असलेल्या लोकांना सांगितली. ही गोष्ट इतकी वाढली की, आरती सिंग म्हणाली की शहनाजला कोणाच्या चरित्रावर अशी मस्करी केली नाही पाहिजे. 


नुकत्याच प्रसारीत झालेल्या बिग बॉसच्या भागात दाखवलं गेलं की, शहनाज बाथरूम एरियामध्ये सिद्धार्थ शुक्लाला तिच्या मस्करीला साथ द्यायला सांगितली. सिद्धार्थ डे त्यावेळी बाथरूममध्ये होता. बाथरूमच्या बाहेर उभे राहून शहनाज जोराजोरात सिद्धार्थला म्हणाली की, हा रात्री मला चिटकायला येतो. मला हात लावतो. त्यावर हसत हसत सिद्धार्थ शुक्ला म्हणाला की हे चुकीचं आहे. 


त्यानंतर शहनाज बोलली की, याच कारणामुळे मी त्याच्याशी दोन-तीन दिवसांपासून बोलत नाही. इग्नोर करते आहे. पण इतका प्रेमळ आहे की मी त्याच्यासोबतच बेड शेअर करणार. 
शहनाज हे बोलल्यावर सिद्धार्थ डे बाथरूममधून बाहेर आला आणि सगळे हसू लागले. त्यावेळी शहनाज सिद्धार्थ डेबद्दल बोलत होती तेव्हा तिथे अबू मलिक आळे होते. ते शहनाजला म्हणाले की, असं बोलू नकोस. हे योग्य नाही.


अबू मलिक किचन एरियामध्ये जातात आणि तिथल्या उपस्थित लोकांना शहनाजबद्दल सांगतात. त्यावर आरती म्हणाली की, खूप जास्तच बोलते ती. तिला हे सगळे आता समजत नाही. कोणत्याही मस्करीला मर्यादा असते. मस्ती करायची आहे तर करा पण कोणाच्या चारित्र्याबद्दल बोलू नका. त्यावर देवोलीना बोलली की, आपण कितीही बोललो तरी जोपर्यंत सिद्धार्थ डे स्वतः काही बोलत नाही तोपर्यंत असंच होईल. तोपणदेखील वहावत जातो सर्व गोष्टीत.

Web Title: Bigg Boss 13 Salman Khan Show Shehnaz Kaur Gill Says Siddharth Dey Touches Me At Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.