ठळक मुद्देबिग बॉस शोला एक्सटेन्शन मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.

बिग बॉस 13’ रंगात आला असताना सलमान खान घेणार ‘एक्झिट’?
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’ मधील हाय व्होल्टेज ड्रामा वाढत असताना चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी आहे. होय, एकीकडे ‘बिग बॉस 13’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असताना दुसरीकडे  होस्ट सलमान खान हा शो सोडण्याच्या तयारीत असल्याचे कळतेय.
  सध्या ‘बिग बॉस 13’बद्दल प्रेक्षकांमध्ये असलेला उत्साह पाहता शोच्या मेकर्सनी फिनाले काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.‘बिग बॉस 13’चा फिनाले येत्या 12 जानेवारीला होणार होता. मात्र आता हा 16 फेब्रुवारीला या शोचा फिनाले एपिसोड प्रसारित केला जाणार असल्याचे कळतेय. पण नेमक्या याच निर्णयामुळे सलमानला हा शो मध्येच सोडावा लागणार आहे.


चर्चा खरी मानाल तर ‘बिग बॉस 13’चा होस्ट सलमान खानने ‘राधे’ या त्याच्या आगामी सिनेमासाठी शूटिंग डेट आधीच बुक केल्या होत्या. अशात ‘बिग बॉस 13’च्या तारखा वाढल्याने हा शो होस्ट करणे त्याला अशक्य होणार आहे. त्यामुळे ‘राधे’च्या शूटसाठी सलमान हा शो सोडण्याची शक्यता आहे. सलमानने शो मध्येच सोडला तर हा शो कोण होस्ट करणार? त्याच्या जागी कुणाची वर्णी लागणार? असा प्रश्न तुम्हाला पडणार असेल. तर सलमानची मैत्रीण फराह खान ‘बिग बॉस 13’ होस्ट करताना दिसेल.


बिग बॉस शोला एक्सटेन्शन मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या शोचा 8 वा सीझन सुद्धा अशाचप्रकारे वाढवण्यात आला होता आणि त्यावेळीही डेट बुक असल्याने सलमानला हा शो सोडावा लागला होता. त्यानंतर सलमानची जागी फराह हा शो होस्ट करताना दिसली होती.

Web Title: bigg boss 13 salman khan is leaving the show due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.