Bigg Boss 13: Rashmi gets angry at this housemate, saying - Don't try to be my father | Bigg Boss 13 : रश्मी भडकली घरातील या सदस्यावर, म्हणाली - माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस
Bigg Boss 13 : रश्मी भडकली घरातील या सदस्यावर, म्हणाली - माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस


सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉसच्या तेराव्या सीझनच्या सुरूवातीपासूनच वादविवाद व कनेक्शन बनताना आणि बिघडताना पहायला मिळत आहेत. शोमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सलमान खानने सर्व स्पर्धकांना गैरसमजाचे फुग्गे हे टास्क दिलं होतं. या टास्कमध्ये स्पर्धकांना आपले विचार मांडण्याची संधी दिली होती. 


या टास्कमध्ये कंटेस्टंटंना तीन-तीन फुग्यांचा हेअरबॅण्ड दिले होते. या टास्कमध्ये स्पर्धकांमा कोणत्या एका को-कंटेस्टंट्सना त्याच्याबद्दलचा गैरसमज सांगून डोक्यावर असलेले फुगे फोडायचे होते. या टास्कचा पूरेपार फायदा उचलत आपला राग व्यक्त केला.
शेफाली बग्गा हिने सिद्धार्थ शुक्लाचा फुगा फोडत ब्लडी फूल म्हटलं. शेफालीने सिद्धार्थच्या गैरसमजाचा फुगा फोडत म्हटलं की, याला वाटतं की तो खूप कुल आहे. मात्र हा कुल नाही ब्लडी फूल आहे. शेफालीच्या गोष्टीवर सलमान खानने सांगितलं की, सिद्धार्थ स्वतःला कूल नाही समजत उलट तुला हा गैरसमज आहे की तो कुल आहे. यावर शेफाली स्पष्ट करत म्हटलं की, सिद्धार्थचं तिच्यासोबतचं वागणं चांगलं नाही, त्यामुळे त्याचा फुगा फोडला.


यानंतर घरातील सर्वात जास्त गैरसमजाचे फुगे सिद्धार्थ डेने फोडले. सिद्धार्थ डे एकटा असा व्यक्ती होता ज्याचे तिनही फुगे फोडले होते. त्यानंतर त्याला आणखीन फुग्यावाला हेअर बॅण्ड देण्यात आला. रश्मीने सिद्धार्थ डेचा फुगा फोडत म्हटलं की, तू माझा बाप नाहीस, त्यामुळे बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस.


तर शहनाजने महिराला ओव्हर कॉन्फिडंट म्हणते त्याचा फुगा फोडला आणि माहिराने शहनाजचा. असंच पारसने असीमच्या बॉ़डीवर कमेंट करत त्याचा फुगा फोडला. पहिल्या आठवड्यात घरात हायव्हॉल्टेज ड्रामा पहायला मिळाला. 

Web Title: Bigg Boss 13: Rashmi gets angry at this housemate, saying - Don't try to be my father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.