bigg boss 13 koena mitra shocking allegations on salman khan after eviction | Bigg Boss 13 : घराबाहेर होताच सलमान खानवर भडकली कोएना मित्रा, पण का?
Bigg Boss 13 : घराबाहेर होताच सलमान खानवर भडकली कोएना मित्रा, पण का?

ठळक मुद्देवीकेंडच्या वारमध्ये सलमान मला मुद्दाम लक्ष्य करत असल्याचे मला जाणवत होते. त्याचे वागणे कमालीचे निराशाजनक होते, असेही कोएना म्हणाली.

बिग बॉस 13’मध्ये सध्या फिनाले रेस सुरु झाली आहे. वीकेंडच्या वारमध्येच सलमान खानने याची घोषणा केली होती. याचदरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात पहिले एविक्शन झाले आणि दोन स्पर्धक घराबाहेर पडलेत. यातलीच एक म्हणजे अभिनेत्री कोएना मित्रा. पहिल्याच टास्कमध्ये कोएनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण अचानक कोएना घराबाहेर झाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. आता कोएनाने यावर चुप्पी तोडत सलमानवर आरोप केले आहेत.

इंडिया टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कोएना यावर बोलली. सलमानने मला माझी बाजू मांडण्याची साधी संधीही दिली नाही. एका आठवड्यातच मला सलमानचे वागणे खटकू लागले होते. तो एकतर्फी असल्याचे मला जाणवले होते. शहनाजने खिल्ली उडवल्याच्या मुद्यावर मी बोलत असताना सलमानने मध्येच मला टोकत, तिचा बचाव केला. लोकांना हे आवडले, असे म्हणत त्याने शहनाजची बाजू घेतली. सलमान शहनाजला झुकते माप देतोय, असे कोएना म्हणाली.

मी घरात असताना शहनाजला कुणीच पसंत करत नव्हते. सगळे तिच्यावर टीका करायचे. प्रेक्षकांना मोठेपण पाहायला आवडणार नाही का? असा प्रश्न मी सलमानला केला होता. यावर मनाचे मोठेपण दाखवण्यासाठी अन्य अनेक जागा आहेत, असे तो म्हणाला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे. बिग बॉस हा शो तत्त्व आणि सुसंस्कृतपणा यासाठी नाही. या शोसाठी सन्मानास पात्र, बुद्धिमान, सुशिक्षित महिला सलमानला नको आहेत. हे व्यासपीठ सर्वांसाठी नाही, असे त्याचे म्हणणे आहे. असे असेल तर बिग बॉस भारतात का? तुम्हाला या शोद्वारे काय सांगायचे आहे? असे मला विचारावेसे वाटते. वीकेंडच्या वारमध्ये सलमान मला मुद्दाम लक्ष्य करत असल्याचे मला जाणवत होते. त्याचे वागणे कमालीचे निराशाजनक होते, असेही कोएना म्हणाली.


Web Title: bigg boss 13 koena mitra shocking allegations on salman khan after eviction
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.