bigg boss 13 fame shehnaaz gill father santokh singh sukh booked for rape-ram | ‘Bigg Boss 13’फेम शहनाज गिलच्या वडिलाविरोधात गुन्हा दाखल, बंदुकीच्या धाकावर बलात्काराचा आरोप

‘Bigg Boss 13’फेम शहनाज गिलच्या वडिलाविरोधात गुन्हा दाखल, बंदुकीच्या धाकावर बलात्काराचा आरोप

ठळक मुद्देफिनाले संपून काही तास होत नाहीत तोच शहनाजचे वडील संतोष सिंग चर्चेत आले होते. 

बिग बॉस 13’मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारी शहनाज गिल सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.  ‘बिग बॉस 13’ घरात शहनाज प्रचंड लोकप्रिय झाली होती, सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. याच शहनाजचे वडील संतोष सिंगविरोधात जालंधरमध्ये एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
40 वर्षांच्या पीडितेने गत मंगळवारी हा गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसाऱ, संतोष सिंग जालंधरमध्ये राहणा-या लकी संधूचा जुना मित्र आहे. गेल्या 12 वर्षांपासून दोघेही एकमेकांना ओळखतात. पीडित महिलेचा अलीकडे लकी संधूसोबत एका कारणावरून वाद झाला होता. यादरम्यान लकी संतोष सिंगच्या घरी राहत असल्याचे तिला कळले. 14 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पीडित महिला कार घेऊनलकी संधूला भेटायला संतोष सिंगच्या घरी पोहोचली. संतोष सिंग बाहेरच तिची वाट पाहत होता. पीडितेसोबत बोलण्यासाठी तो कारमध्ये आला आणि यानंतर बंदुकीच्या धाकावर त्याने तिच्यावर बलात्कार केला, याबद्दल वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही दिली,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस टीम  संतोष सिंगला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेली असता तो तेथे आढळला नाही.

 बिग बॉस 13च्या फिनालेनंतरही झाली होती चर्चा
फिनाले संपून काही तास होत नाहीत तोच शहनाजचे वडील संतोष सिंग चर्चेत आले होते. ‘बिग बॉस 13’ फिनालेआधी या शोमधील स्पर्धक शहनाज गिलचे स्वयंवर होणार, अशी घोषणा करण्यात आली होती. बिग बॉसच्या घरातच ही घोषणा झाल्याने शहनाजच्या स्वयंवर कसे होणार, शहनाज कुणाच्या गळ्यात माळ घालणार, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पण यानंतर अचानक शहनाजचे वडील संतोष सिंग गिल यांनी लेकीच्या या स्वयंवराला कडाडून विरोध केला होता, ‘माझ्या मुलीला पंजाबची कतरीना कैफ म्हणून ओळखले जाते. पण चॅनल तिला राखी सावंत बनवण्याचे प्रयत्न करतेय. चॅनलने हे प्रयत्न थांबवले नाहीत तर प्रसंगी मी शिवसेनेची मदत घेईल,’ असे संतोष म्हणाले होते. अर्थात याऊपरही शहनाज गिलचा स्वयंवर शो झाला होता.

Web Title: bigg boss 13 fame shehnaaz gill father santokh singh sukh booked for rape-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.