Bigg Boss 13: Controversy between Paras Chhabra and Salman Khan over girlfriend aspirations, watch their video | Bigg Boss 13 : गर्लफ्रेंड आकांक्षावरून पारस छाब्रा व सलमान खानमध्ये झाले वाद, पहा त्यांचा हा व्हिडिओ

Bigg Boss 13 : गर्लफ्रेंड आकांक्षावरून पारस छाब्रा व सलमान खानमध्ये झाले वाद, पहा त्यांचा हा व्हिडिओ


बिग बॉस १३मध्ये आज सूत्रसंचालक सलमान खान वीकेंड का वार घेऊन येणार आहे. यादरम्यान तो खूप रागात दिसला. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सलमान खान भडकलेला दिसत असून स्पर्धक पारस छाब्राला खडेबोल सुनावताना दिसत आहे. या व्हिडिओमधील क्लिपमध्ये सलमान खान, पारस छाब्राची गर्लफ्रेंड आकांक्षाबद्दल खुलासा करणार होता आणि त्यावेळी पारस त्याला मध्येच टोकतो आणि म्हणतो की बेकार गोष्टी बोलू नको. हा व्हिडिओ खूप सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पारस छाब्राच्या गैरवर्तनावर सलमान खान खूप भडकला आणि त्याला बोलला की, तुझं तोंड करून बस. या व्हिडिओत पुढे पहायला मिळतंय की, पारस छाब्राला घरातील इतर सदस्य हळू बोलण्यासाठी समजवतात. मात्र तो त्यावर रिएक्ट करत म्हणतो की इथे मी हे सगळं ऐकायला आलेलो नाही. पारसला अशापद्धतीने बोलताना पाहून सलमान त्यावर नाराज होतो आणि मोठ्या आवाजात बोलतो की, मी आत येऊ का?
बिग बॉस १३च्या या व्हिडिओला कलर्सने ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले की, पारस छाब्राच्या गर्लफ्रेंडबद्दल कोणतं सत्य सलमान खानला माहित आहे. पहा त्यांचे अँग्री रूप. 

Web Title: Bigg Boss 13: Controversy between Paras Chhabra and Salman Khan over girlfriend aspirations, watch their video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.