Bigg Boss 13: Bigg Boss 13 Siddharth Shukla And Rashmi Desai Shoot Romantic Scene User Reactions | Bigg Boss 13 : एकमेकांचे वैरी असताना अचानक बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला-रश्मी देसाईचा रोमांस?
Bigg Boss 13 : एकमेकांचे वैरी असताना अचानक बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला-रश्मी देसाईचा रोमांस?


हिंदीमधील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस १३' शो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. घरातील नवीन वाद आणि हायव्हॉल्टेज ड्रामा पाहून हा शो टीआरपी लिस्टमध्ये आला आहे. मात्र या घरातले एकमेकांचे वैरी असणारे सिद्धार्थ शुक्लारश्मी देसाई यांचा रोमांस प्रेक्षकांना धक्का देणार आहे. या दोघांचा स्विमिंग पूलमधील रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडीओ शहनाझ गिलनं शूट केला आहे.

बिग बॉसच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर नुकताच हा व्हिडीओ शेअर केला गेला. त्यानंतर हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला रोमांस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून लिहिलंय की, दिल से दिल तक बेडरुम पासून ते स्विमिंग पूल पर्यंत सिद्धार्थ आणि रश्मीचा रोमान्स. हा एपिसोड आज रात्री प्रसारित केला जाणार आहे. 

हा व्हिडीओ शहनाझ गिल शूट करताना दिसते आहे. तर रश्मीची मैत्रिण देवोलिना त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकताना दिसते आहे. असं म्हटलं जातंय की हा एका टास्कचा भाग आहे. ज्यात शहनाझला दिग्दर्शक बनवण्यात आलं असून सिद्धार्थ-रश्मीला रोमँटिक सीन्स देण्यास सांगण्यात आलं आहे. 

या व्हिडीओमुळे प्रेक्षक संतापले आहेत कारण, रश्मी नेहमीच सिद्धार्थ तिचा मोठा शत्रू असल्याचं सांगताना दिसते. तर दुसरीकडे शहनाझ आणि सिद्धार्थ यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे मग हा असा टास्क देण्याची गरज काय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. त्यामुळे आज प्रसारीत होणाऱ्या भागात हा टास्क होता की काय नवीन ड्रामा हे चित्र स्पष्ट होईल.
 

Web Title: Bigg Boss 13: Bigg Boss 13 Siddharth Shukla And Rashmi Desai Shoot Romantic Scene User Reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.