बिग बॉसचे घर असंच काहीसं असतं जिथे कधी प्रेम पहायला मिळतं तर कधी हेवेदावे किंवा भांडणं. मात्र सध्या घरात हेवेदावे विसरून प्रेम बहरताना दिसत आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात एकमेकांशी वैर असणारे सिद्धार्थ शुक्ला व रश्मी देसाई यांची एका टास्क दरम्यान रोमँटिक केमिस्ट्री अनुभवायला मिळाली. त्यानंतर आता आणखीन सदस्यांमध्ये प्रेम बहारताना दिसत आहे. 

पंजाबची ऐश्वर्या राय म्हणजेच हिमांशी खुराना सध्या बिग बॉसच्या घरात खूप सक्रीय दिसते आहे आणि ती आसिम रियाजच्या जास्त जवळ आल्याचं पहायला मिळत आहे. आसिमच्या चक्करमध्ये तर हिमांशी तिच्या बॉयफ्रेंडलादेखील विसरत चालली आहे. कदाचित याच कारणामुळे आसिमला स्वतःपासून दूर ठेवणारी हिमांशी स्वतः त्याला किस करताना दिसून आली. 


बिग बॉस शोच्या ताज्या एपिसोडमध्ये हिमांशी व आसिम एकमेकांना किस करताना दिसले. इतकंच नाही तर आसिमने हिमांशीच्या वाढदिवसादिवशी हार्ट शेपचा पराठादेखील बनवणार आहे. याचदरम्यान दोघे एकमेकांना किस करताना दिसले. 


आसिम व हिमांशीची जवळीकता तिच्या चाहत्यांना देखील चकीत करणारी होती. खरेतर शोमध्ये आसिमने हिमांशीचं कौतूक करणं सुरू केलं होतं. मात्र हिमांशी शेफालीला हे सांगताना दिसली होती की, मला हे सर्व आवडत नाही. मी एंगेज आहे. माझा बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे आसिमला सांग हे सगळं नको करू.


मात्र लोकांना वाटतंय की आसिमची क्यूटनेसच्या पुढे हिमांशीदेखील वहावत चालली आहे. एक दिवसांपूर्वी आसिम स्वतः हिमांशी सोबत त्याच्या फिलिंग्सबद्दल बोलताना दिसत होते.

Web Title: Bigg Boss 13: asim riaz and himanshi khurana kiss each other in bigg boss13 house watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.