Bigg Boss 13: Is Ameesha Patel the first contestant on Salman Khan's Bigg Boss? | पहिल्याच चित्रपटात हृतिक रोशनसोबत झळकलेली ही अभिनेत्री असणार बिग बॉसची पहिली स्पर्धक?
पहिल्याच चित्रपटात हृतिक रोशनसोबत झळकलेली ही अभिनेत्री असणार बिग बॉसची पहिली स्पर्धक?

ठळक मुद्देबिग बॉसच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावलेली ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अमिषा पटेल आहे. ती काही महिन्यांपूर्वी भैय्याजी सुपरहिट या चित्रपटात दिसली होती. पण त्यानंतर तिला कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळालेले नाहीये.

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. आता या कार्यक्रमाचा 13 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनची घोषणा झाल्यापासून या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या कार्यक्रमाची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत झाली. यावेळी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रेक्षकांच्या लाडक्या भाईजानने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. पण त्याचसोबत या पत्रकार परिषदेला प्रेक्षकांना बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीला पाहायला मिळाले. या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. पण गेल्या काही वर्षांपासून ही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ही अभिनेत्री बिग बॉसच्या या सिझनमध्ये झळकू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बिग बॉसच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावलेली ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अमिषा पटेल आहे. ती काही महिन्यांपूर्वी भैय्याजी सुपरहिट या चित्रपटात दिसली होती. पण त्यानंतर तिला कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळालेले नाहीये. आता ती बिग बॉसमध्ये झळकणार अशी चर्चा रंगली आहे. अमिषा बिग बॉस 13 चा भाग असणार की नाही हे प्रेक्षकांना 29 सप्टेंबरलाच कळणार आहे. अमिषा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून दिसणार की नाही हे सरप्राईज लोकांना कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी मिळेल असे तिने या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत अमिषा आणि सलमान यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. सलमान नेहमीच थट्टा-मस्करीच्या मूडमध्ये असतो. या पत्रकार परिषदेत देखील अमिषाची तो टर उडवताना दिसला. पण अमिषाने देखील त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. 

सलमान अमिषाला म्हटला की, तू नेहमीच रडत असते. त्यामुळे तुझे नाव मी मीना कुमारी असे ठेवले आहे. त्यावर अमिषा म्हणाली, तूच मला नेहमी रडवतोस... अमिषाच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

बिग बॉसच्या गेल्या सिझनच्या पत्रकार परिषदेला भारती सिंग आणि तिचा पती हर्षने उपस्थिती लावली होती. पण ते दोघेही बिग बॉसच्या घरात दिसले नव्हते. त्यांच्याप्रमाणेच अमिषा देखील बिग बॉसच्या घरात दिसणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे. 


Web Title: Bigg Boss 13: Is Ameesha Patel the first contestant on Salman Khan's Bigg Boss?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.