बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये गोविंदाची भाची आरती सिंग हिचा प्रवास चाहत्यांना भावतो आहे. आरती सिंगचं नाव बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आले होते. आता बिग बॉसच्या घरात आरतीने सिद्धार्थ सोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं. ती पुढील वर्षी लग्न करणार असल्याचंही तिने सांगितले.

आरती सिंगने देवोलिनाला सांगितलं की, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी माझे व सिद्धार्थ शुक्लाच्या अफेयरच्या बातम्या येत होत्या. आरती सिंगच्या या गोष्टी ऐकून देवोलिना भट्टाचार्जी चकीत झाली. त्यावर देवोलिनाने सांगितले की, मी तर असं कोणतं आर्टिकल पाहिलं नाही. मग आरती म्हणाली की, मी असे आर्टिकल पाहिले होते. मला वाटले की हे खूप चुकीचं आहे. 


आरती म्हणाली की, मी सुरूवातीला बिग बॉसच्या घरात सिद्धार्थपासून दूर दूर होते. मात्र नंतर मला जाणवलं की तो योग्य आहे. 


लग्नाबद्दल बोलताना आरती देवोलिनाला बोलली की, मला लग्न केलं पाहिजे. या फालतू गोष्टीत मला फसायचं नाही. मी पुढील वर्षी लग्न करायचं आहे. मला मुलांना जन्म द्यायचा आहे. मी जास्त करियर ओरिएंटेड नाही.

मला कृष्णाने विचारले होते की तुझं कोणासोबत अफेयर नाही आहे का? त्यावर मी त्याला नाही सांगितलं होतं.


बिग बॉसच्या घरात आरती सिंगची सिद्धार्थ शुक्लासोबत खूप चांगली मैत्री आहे. दोघांचे बॉण्डिंग चाहत्यांना खूप आवडते आहे. 


Web Title: Bigg Boss 13: Aarti Singh to get married next year, breaks silence on affair with Siddharth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.