Bigg Boss 11 : ड्रामा क्वीन हिना खानने घातली करण पटेलशी हुज्जत, करणने दिले असे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 12:44 PM2017-12-10T12:44:12+5:302017-12-10T18:15:12+5:30

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काही टीव्ही सेलिब्रिटींना प्रवेश देण्यात आला होता. त्यानुसार करण पटेलने घरात प्रवेश करून हिना खानची चांगलीच कानउघडणी केली, परंतु तिने त्याच्याबरोबरच हुज्जत घातली. वाचा सविस्तर!

Bigg Boss 11: Drama queen Hina Khan put it on the ground, shouting with Patel! | Bigg Boss 11 : ड्रामा क्वीन हिना खानने घातली करण पटेलशी हुज्जत, करणने दिले असे उत्तर!

Bigg Boss 11 : ड्रामा क्वीन हिना खानने घातली करण पटेलशी हुज्जत, करणने दिले असे उत्तर!

googlenewsNext
ग बॉसचा सीजन ११ अंतिम टप्प्यात असून, घरातील वातावरण आता चांगलेच चिघळताना दिसत आहे. त्यातच बिग बॉसकडून शोमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी एकापेक्षा एक फंडे वापरले जात असल्याने, त्याचा परिणाम थेट घरातील सदस्यांवर होत आहे. होय, या आठवड्यात घरात घरातील सदस्यांच्या आप्तस्वकियांना प्रवेश दिला होता. त्याचबरोबर काही टीव्ही सेलिब्रिटींना घरात एंट्री दिली होती. त्यामध्ये ‘ये है मोहब्बतें’ फेम करण पटेल, बिग बॉसचे एक्स स्पर्धक रोहन मेहरा आणि करिष्मा तन्ना यांनी घरात अचानक एंट्री घेऊन घरातील सदस्यांचे कान भरले. परंतु या तिघांनीही हिना खान आणि अर्शी खानवर निशाणा साधत ते किती चुकीच्या पद्धतीने गेम खेळत असल्याचे सांगिंतले. मात्र ही बाब ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाºया हिना खानला अजिबातच पचनी पडली नाही. तिने होस्ट सलमान खानसमोरच करण पटेलशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. 

त्याचे झाले असे की, बिग बॉसने या आठवड्यात तीन सेलिब्रिटींना घरात प्रवेश देऊन घरातील सदस्यांकडून होत असलेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार करण पटेल हा सर्वांत अगोदर घरात प्रवेश करतो. जेव्हा करण प्रवेश करतो, तेव्हा घरातील अन्य सदस्यांना स्टॅच्यू म्हणून राहण्यास बिग बॉसकडून आदेश मिळतो. करण घरातील काही सदस्यांच्या भेटी घेतल्यानंतर हिना खानकडे जातो. वास्तविक करणने हिनाचा या अगोदरही ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. अशात समोरासमोर हिनाची कानउघडणी करण्याची संधी मिळाल्याने, तो हिनाला तिच्या खेळाविषयी बरेचसे सल्ले देतो. तो म्हणतो की, ‘तू जे काही उलटसुलट बोलतेस ते १३० कोटी जनता बाहेर बघत  आहे.’ करणचे हे शब्द ऐकताच हिना आश्चर्यचकीत असल्याची रिअ‍ॅक्शन देते. 
 }}}} ">The housemates are grilled by our special guests with some tough questions! Keep watching #BB11 to witness all the drama! @KARISHMAK_TANNA@TheKaranPatelpic.twitter.com/g7Smt6tJlB— COLORS (@ColorsTV) December 8, 2017
त्यानंतर करिष्मा तन्ना आणि रोहन मेहरा एकापाठोपाठ घरात प्रवेश करतात. हे दोघेदेखील हिनालाच डोस पाजताना दिसतात. रोहन हिनाला म्हणतो की, ‘तू अन्य सदस्यांच्या तुलनेत खूप मोठे सेलिब्रिटी आहेस, अशात तुझ्याकडून जे काही बोलले जात आहे त्याचा बाहेर चुकीचा संदेश जात आहे. तू सेलिब्रिटींबद्दल बोलणे बंद कर.’ तर करिष्मा हिनाला म्हणते की, ‘तू जे काही बोलते त्यावर तुझी भूमिका ठाम असायला हवी, पण तसे तू वागत नाही.’ हिनाला या दोघांच्या सल्ल्यांपेक्षा करणने दिलेला सल्ला चांगलाच झोंबतो. जेव्हा करण सलमान खानसोबत मी टीव्हीच्या माध्यमातून हिनासमोर जातो, तेव्हा हिना त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसते. त्याचबरोबर तू एवढे बोलल्यापेक्षा काहीकाळ घरात राहून दाखव, असे आवाहनही करते. परंतु करण पुन्हा ती कशा धुर्त पद्धतीने गेम खेळत आहे, हे दाखवून देतो. 

Web Title: Bigg Boss 11: Drama queen Hina Khan put it on the ground, shouting with Patel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.