मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण मेकओव्हर केल्यानंतर लगेचच कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागला तर सोने पे सुहागाच. हेच घडलं आहे बिग बॉस १० या रिअॅलिटी शोची स्पर्धक लोकेश कुमार हिच्याबाबत. बिग बॉस ११ मध्ये सामान्य जनतेतील प्रतिनिधी म्हणून ती सहभागी झाली होती.सलमान खानची फेव्हरेट कंटेस्टंट पैकी एक होती.  मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडले आहेत असं म्हटल्यास असं वावगं ठरु नये. मेकओव्हरमुळे दक्षिणेतील  प्रोजेक्ट तिच्या हाती लागले आहेत. 

तमिळ सिनेमाची ऑफर लोकेशला मिळाली होती. मेकओव्हरसह तिने आपलं नावसुद्धा बदललं आहे. तिने आपलं नाव आता लोवी शरना असं करण्यात आलं आहे. याच नावाने आपली ओळख निर्माण व्हावी अशी तिची इच्छा आहे. 


लोकेश कुमारी शर्माने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा लूक अगदीच वेगळा दिसत आहे. लोकेश सध्या तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत असून त्यासाठी ती वेट लॉस करत आहे. तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे, त्यात ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. 

ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून लोकेश आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. 

वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 'बिग बॉस'मुळे लोकेश उर्फ लोवीला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला आहे. दिल्लीत राहणा-या लोकेशचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला आहे. तिला गायन,नृत्य आणि ट्रॅव्हलिंगची हौस आहे. अर्थशास्त्र या विषयात तिने मास्टर्सची डिग्री मिळवली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 10 Ex Contestant Lokesh Kumari Looks Bold See Her Amazing Transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.