बिग बॉस 11 मध्ये कॉमनर बनत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करणारी स्पर्धक लोकेश कुमारी तुम्हाला आठत असले. आपल्या देसी अंदाजाने तिने या शोमुळे अमाप लोकप्रियतमा मिळवली. या शोमधून बाहेर पडल्यानंतर मात्र तिने स्वतःला बदलत मेकओव्हर केला आणि याच मेकओव्हरने तिला सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळवून दिली. मेकओव्हरसह तिने आपलं नावसुद्धा बदललं आहे. तिने आपलं नावात बदल करत लोवी शरना असं केले आहे. यापुढे याच नावाने आपली ओळख निर्माण व्हावी अशी तिची इच्छा आहे. 


सोशल मीडियावर ती खूप अॅक्टीव्ह असते. विविध अंदाजातील फोटो शेअर करत असल्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. पुन्हा एकदा लोकेशने नवीन फोटो शेअर केला आहे. पहिल्यांदाच न्यूड अंदाजात तिने हे फोटोशूट केले आहे. तिचा हा सेक्सी अंदाज पाहून संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वीही तिने अनेकवेळा फोटोशूट केले होते. मात्र असे न्यूड फोटोशूट करत तिने सोशल मीडियावर एकच धूमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. तुर्तास तिचे हे फोटो पाहून पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा असेच हा फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट होते. 

गेल्या काही महिन्यांपासून लोकेश आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  दिल्लीत राहणा-या लोकेशचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला आहे. तिला गायन,नृत्य आणि ट्रॅव्हलिंगची हौस आहे. अर्थशास्त्र या विषयात तिने मास्टर्सची डिग्री मिळवली आहे.

Web Title: Big Boss's X Contestant Lokesh Kumari Sharma gets trolled Because Of Nude Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.