बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला आहे. यंदाच्या सीझनचे विजतेपद शिव ठाकूरनं पटकावलं आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळाले आहेत. शिव हाच बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे. 


बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा जगताप यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम असल्याचं पहायला मिळतंय.

वीणाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिवसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचा स्नॅपशॉट काढून शेअर केला आहे. त्यात ते दोघं हार्ट शेप बनविताना दिसत आहेत. वीणाने हे फोटो शेअर करून म्हटलं की सकाळी उठवलं माझ्या शेरनं. हॅप्पी जर्नी. कम सेफ.


शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.

लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.

शिव व वीणाचे चाहते ते दोघं लग्नबेडीत अडकणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

Web Title: Big Boss Marathi 2: Shiv Thakur And Veena Jagtap Love photo on Social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.