ठळक मुद्देधमाकेदार डान्सनंतर घरातील वातावरण एकदम हलकफुलकं झालंरुपाली आणि नेहा अभिजित बिचुकले यांच्यावर चिडल्या आहेत

बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. सवाल ऐरणीचा हा टास्क काल देखील पार पडला. सदस्य भावूक झाले आणि त्याचबरोर बरीच मज्जा मस्ती करताना देखील दिसले. नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी घरच्यांना गमवाव्या लागल्या त्यांच्या प्रिय गोष्टी. अभिजित केळकर त्याच्या कुटुंबाचे फोटो तर रुपालीने तिच्या भावाने दिलेला टेडी नष्ट करताना खूप भावूक झाले पण यानंतर मात्र विणा आणि मैथिली या प्रक्रियेमध्ये सेफ झाले.

तर अभिजित केळकर, किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, विद्याधर जोशी यांनी सादर केलेल्या धमाकेदार डान्सनंतर घरातील वातावरण एकदम हलकफुलकं झालं होतं  हे चौघे देखील या प्रक्रियेमध्ये सेफ झाले. आज घरामध्ये प्रेक्षकांना सदस्यांची मैत्री, त्यांच्यामधला वाद – विवाद, तर कुणाचे रडण बघायला मिळणार आहे.

सवाल ऐरणीचा या टास्क दरम्यान असं काय घडलं कि, पराग आणि वैशाली मध्ये वाद झाला आणि पराग म्हणाला “मला तुम्ही तिघीही आवडत नाही” कोण आहेत या तिघी ? काय घडलं टास्क मध्ये ? हे आज कळेलच. आज रुपाली, नेहा यांचा अभिजित बिचुकले यांच्यावर शब्दांचा मारा.

रुपाली आणि नेहा अभिजित बिचुकले यांच्यावर चिडल्या आणि त्यांच्यामध्ये झालेला वाद वणव्यासारखा पसरला. या सगळ्या भांडणामध्ये रुपालीने अभिजित बिचुकले यांना खडसावून सांगितले – “शहाणपणा करायचा नाही, पाठीमागे बोलू नका.” या सगळ्या संभाषणा नंतर नेहाने अभिजित बिचुकले यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कि, तुम्ही तुमच्या वागण्याचा विचार करा. याचा काही परिणाम त्यांच्यावर होईल ? त्यांच्या वागण्यामध्ये काही बदल होईल ? हे लवकरच कळेल.


 

Web Title: Big Boss Marathi 2: Big fight will happen today in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.