big boss 13 salman khan fees per episode in the show | OMG ! ‘बिग बॉस 13’ होस्ट करण्यासाठी सलमान खानला मिळणार इतके कोटी?
OMG ! ‘बिग बॉस 13’ होस्ट करण्यासाठी सलमान खानला मिळणार इतके कोटी?

ठळक मुद्दे‘बिग बॉस 13’च्या स्पर्धकांबद्दलही सध्या चर्चा सुरु आहे. याशिवाय ‘बिग बॉस 13’चे लोकेशन, थीम याबाबतही रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे ‘भारत’ या चित्रपटाच्या यशामुळे खूश आहे. दुसरीकडे त्याचे टीव्ही शो सुद्धा जोरात आहेत. ‘नच बलिए 9’ सलमान प्रोड्यूस करतोय. ‘बिग बॉस 13’ हा शो सुद्धा सलमान खान प्रोड्यूस करणार असल्याचे कळतेय. शिवाय या शोचा होस्ट म्हणूनही सलमान दिसणार आहे.  तूर्तास हा शो होस्ट करण्यासाठी सलमानने घेतलेल्या मानधनाचीही जोरात चर्चा आहे.
ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा शो होस्ट करण्यासाठी सलमान सुमारे 400 कोटी रूपये घेणार आहे. टीव्ही शो अपडेट्स देणा-या ‘द खबरी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सलमान या टीव्ही शोला चौथ्या सीझनपासून होस्ट करतोय. या शोच्या एका वीकेंडसाठी म्हणजे शनिवार-रविवारच्या दोन एपिसोडसाठी सलमान 31 कोटी रूपये मानधन घेणार आहे. शोमध्ये 13 वीकेंड असणार. या हिशेबाने ही रक्कम 403 कोटींच्या घरात जाते. अद्याप या वृत्तालाकुठलाही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

मागच्या सीझनमध्ये त्याने 300 ते 350 कोटी रूपये घेतले होते.  बिग बॉस सीझन 4 आणि 6 च्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमानला 2.5 कोटी रूपये दिले गेले होते, असे मानले जाते. यानंतर सीझन 7 मध्ये ही रक्कम वाढवून 5 कोटी रूपये करण्यात आली होती. यानंतर सीझन 8 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 5.5 कोटी, सीझन 9 साठी प्रत्येकी 8 कोटी दिले गेले होते.   सीझन 10 साठी ही रक्कम 8 कोटींपेक्षा जास्त होती.


बिग बॉस 13’च्या स्पर्धकांबद्दलही सध्या चर्चा सुरु आहे. याशिवाय ‘बिग बॉस 13’चे लोकेशन, थीम याबाबतही रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत.

Web Title: big boss 13 salman khan fees per episode in the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.