गुहागरच्या आठवणींमध्ये रमली 'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:14 AM2022-04-07T11:14:52+5:302022-04-07T11:15:22+5:30

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेमध्ये तन्वी मुंडले (Tanvi Mundale) प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे.

Bhagya Dile Tu Mala Fame Tanvi Mundale lost in Guhaghar memories | गुहागरच्या आठवणींमध्ये रमली 'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडले

गुहागरच्या आठवणींमध्ये रमली 'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडले

googlenewsNext

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला (Bhagya Dile Tu Mala) मालिकेमध्ये तन्वी मुंडले (Tanvi Mundale) प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहे. तिथे शूट करत असताना कावेरी म्हणजेच तन्वी मुंडलेने आणि सेटवरील बाकीच्या सदस्यांनी बरीच धमालमस्ती केलेली आहे. त्यातलेच काही हे फोटोज. 

तन्वीचा मालिकेतील लुक, कावेरी आणि राजवर्धनची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. राजवर्धनची भूमिका विवेक सांगळे साकारत आहेत. तन्वीने गुहागर शूटिंग दरम्यानचे काही किस्से सांगितले. ती म्हणाली, “तिकडे शूट करताना खूपच मज्जा आली, मी स्वत: कोकणची असले तरीदेखील मी पहिल्यांदाच गुहागर ठिकाणी कामासाठी म्हणून आले. खूप कमाल अनुभव होता. प्रत्येकच गोष्ट खूप सुंदर होती. मग समुद्र असो वा छोट्या छोट्या पायवाटा असो, सगळं हिरवगार... सगळं असं खूप समृद्ध आपण म्हणतो ना तसं होतं. मी पाहिल्यांदा साडी नेसून सायकल चालवली, हा अनुभव खूप मस्त होता.

ती पुढे म्हणाली की,  मुंबईमध्ये आल्यावर मी माझ्या सायकलला खूप मिस करते आहे... आठवण येते आहे मला तिची. आम्ही शूटिंग तर केलंच पण, तिथून अनेक आठवणी घेऊन आलो आहोत. हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील. भाग्य दिले तू मला मालिका नक्की बघा सोम ते शनि रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळाले आहे.

Web Title: Bhagya Dile Tu Mala Fame Tanvi Mundale lost in Guhaghar memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.