२००८ साली प्रसारीत झालेली मालिका 'बालिका वधू' लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील छोटी आनंदी म्हणजेच अभिनेत्री अविका गौर हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. वाढत्या वयात अविकाचं वजन जास्त वाढलं होतं. मात्र तिने या गोष्टीचा सामना करत वजन घटविले आहे. आता ती खूप ग्लॅमरस दिसते. 

अविका गौरला बटाटा खूप आवडतो. तिच्या जेवणात बटाटा असायचा पण वजन घटविण्याचे ठरविल्यानंतर अविकाने सर्वात आधी बटाटाचा त्याग केला. तिने वजन घटविण्यासाठी डाएटचा पर्याय अवलंबला आहे.


अविकाच्या डाएटमध्ये जंक फूड व ऑयली फूडला अजिबात स्थान नाही आहे. तर डाएटमध्ये हिरव्या भाज्या, सलाड व मल्टीग्रेन चपाती आणि ब्राऊन राईसचा समावेश असतो. 


अविकाच्या नुसार, तिच्या वजनासाठी स्वाद व पोषणासोबत तडजोड करत नाही. लिंबू पाणी, नारळ पाणी दररोज पिते.


फिट राहण्यासाठी अविका दररोज जिमला जाते. यात डान्सचा देखील समावेश आहे.

अविकाला डान्स खूप आवडतो. हे तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमधून समजते.

वजन कमी करण्यासाठी डान्स खूप चांगला पर्याय असल्याचं तिने सांगितलं. 

Web Title: Balika Vadhu Actress Avika Gor Weight Loss Journey Is Incredible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.