'बावले उतावले' मालिकेने उतावीळ तरूण जोडपे गुड्डू (पारस अरोरा) आणि फुंटी (शिवानी बदोनी) यांचा विनोदी, पण गोड प्रवास दाखवला आहे. तसेच मालिकेने विवाहाच्‍या गुंतागुंती समजण्‍याच्‍या आणि त्‍यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या संघर्षाला देखील दाखवले आहे. मध्‍यप्रदेशच्‍या ग्रामीण भागामधील या कथेने प्रेम, काळजी व काहीशा विनोदासह सुरेखरित्‍या विवाह व नात्‍यांच्‍या विविध पैलूंना दाखवले आहे. सोनी सबवरील ही विनोदी मालिका आता ३ वर्षांची झेप घेणार आहे आणि कथेमध्‍ये नवीन रोमांच आणण्‍यासह काही नवीन चेह-यांना देखील समोर आणणार आहे.

एका धक्‍कादायक घटनेमध्‍ये फुंटीची अपघातामुळे स्‍मृती जाते. ती गुड्डूसोबतच्‍या तिच्‍या विवाहापासून जीवनात घडलेल्‍या सर्व गोष्‍टी विसरून जाते. अत्‍यंत जबाबदार गुड्डू आता आपल्‍या पत्‍नीचे प्रेम पुन्‍हा मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍न करत आहे. पण याच्‍यासमोर एक नवीन आव्‍हान आले आहे. त्‍याच्‍या जीवनात एक नवीन महिला चुलबुली पांडे आली आहे. चुलबुल त्‍याच्‍यावर प्रेम करते आणि त्‍याची पत्‍नी असल्‍याचा दावा करते. फुंटी त्‍याला तिच्‍याबाबत असलेल्‍या हेतूंबाबत विचारते. यादरम्‍यान एक वैकल्पिक थेरपी डॉक्‍टर व फुंटीचा बालमित्र सलमान शर्माचा प्रवेश होतो. तो तिची हरवलेली स्‍मृती परत आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. पण असे करत असताना तो तिच्‍या प्रेमात पडतो. मालिकेमध्‍ये अशी गुंतागुंत निर्माण होते. फुंटीला गुड्डू तिचा पती असल्‍याचे आणि त्‍या दोघांचा विवाह झालेला आहे हे आठवेल का, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

फुंटीची भूमिका साकारणारी शिवानी बदोनी म्‍हणाली, ''मालिकेमधील सर्व नवीन पात्रांसह गुड्डू व फुंटीमधील नात्‍याला देण्‍यात आलेले नवीन वळण पाहताना खूपच छान वाटते. मला वाटते प्रत्‍येकाच्‍या मनात भिती असते की कधीतरी ते प्रेम करत असलेली व्‍यक्‍ती त्‍यांना विसरून जाईल. ही स्थिती अशीच एक परीक्षा आहे. फुंटी व गुड्डूसमोर मोठे आव्‍हान उभे राहिले आहे आणि ते हे आव्‍हान पूर्ण करतात का, हे पाहणे प्रत्‍येकासाठी एक रोमांचपूर्ण अनुभव असणार आहे.''

गुड्डूची भूमिका साकारणारा पारस अरोरा म्‍हणाला, ''मालिका एका नाट्यमय ट्विस्‍टच्‍या दिशेने जात आहे. ३ वर्षांची झेप कथेमध्‍ये पूर्णत: वेगळी, पण रोचक संकल्‍पना घेऊन येत आहे. गुड्डू एका मिशनवर आहे आणि त्‍याने त्‍याचे प्रेम पुन्‍हा मिळवण्‍यासाठी हार मानलेली नाही. तो त्‍याच्‍या पत्‍नीला पुन्‍हा मिळवून तिला त्‍यांच्‍या एकत्र व्‍यतित केलेल्‍या काळाची आठवण करून देणार आहे. हा प्रवास सोपा नाही. पण प्रेक्षक या जोडप्‍याला सर्व विषम परिस्थितींवर मात करून त्‍यांचे प्रेम पुन्‍हा मिळवण्‍याचे प्रयत्‍न करताना पाहण्‍याचा आनंद घेतील.''
 


Web Title: Baavle Utaavle prepares for a leap; Funty and Guddu’s story to continue with new twists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.