ठळक मुद्देपहिल्यांदाच एका पुरुष कलाकाराचे चुंबन घेण्याच्या दृश्याबद्दल आयुषमानने द कपिल शर्मा शो मध्ये सांगितले की, “मला वाटते, एक कलाकार म्हणून अशा प्रसंगांची तयारी ठेवली पाहिजे.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये बॉलीवूडचा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आयुषमान खुराणा हजेरी लावणार आहे. त्याचसोबत ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराज राव, मनूऋषी चड्ढा, सुनीता राजवर आणि मानवी गागरू हे देखील कपिलच्या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत. 

सध्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातील किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे. पहिल्यांदाच एका पुरुष कलाकाराचे चुंबन घेण्याच्या दृश्याबद्दल आयुषमानने द कपिल शर्मा शो मध्ये सांगितले की, “मला वाटते, एक कलाकार म्हणून अशा प्रसंगांची तयारी ठेवली पाहिजे. चित्रपटात काम करत असताना तुम्हाला व्यक्तिरेखेची जी मागणी असेल त्यासाठी तयार असावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा संवेदनशील विषय थोडा हलकाफुलका करण्यासाठी हे दृश्य चित्रपटात असणे गरजेचे होते असे मला वाटते. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 काढून टाकले असले तरी अजूनही ते निषिद्ध मानले जाते. बरेच लोक म्हणतात की, समलैंगिक संबंध नैसर्गिक नाहीत. त्यांचा विश्वास बसण्यासाठी आणि ही संकल्पना त्यांना समजण्यासाठी हे दृश्य चित्रपटात असणे आवश्यक होते.”


 
कपिलने या कलाकारांकडून आणखी काही रंजक किस्से जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आयुषमानने कबूल केले की, लहानपणी त्याची आई आणि त्याचे शिक्षक त्याला ‘फ्रॉगी’ म्हणत असत. कारण त्याच्यात एखाद्या बेडकासारखी ऊर्जा आहे. जितेंद्र कुमारने देखील या कार्यक्रमात एक गुपित सांगितले, तो त्याने लिहिलेली शायरी सोशल मीडिया अकाऊंटवर @फर्जीगुलझार या हॅंडलखाली पोस्ट करतो. त्याला गुलझार साहेबांविषयी नितांत आदर आहे आणि तो त्यांना प्रेरणास्रोत मानतो.

Web Title: Ayushmann Khurrana share his experience of kissing his costar in shubh mangal jyada saavdhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.