ठळक मुद्देअश्मित आणि महक यांनी पाच वर्षांच्या नात्यानंतर आता वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांच्या नात्यात काही महिन्यांपूर्वी दुरावा आला आहे.

अश्मित पटेलला बिग बॉस या कार्यक्रमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये तो झळकला होता तर महक चहलने या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. तसेच महक चहलने वाँटेड या चित्रपटात सलमानसोबत काम केले होते. ते दोघे गेल्या कित्येक वर्षांपासून नात्यात आहेत. त्या दोघांनी साखरपुडा देखील केला होता. तसेच ते दोघे लीव्ह इन मध्ये देखील राहात होते. त्यामुळे आता ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण त्यांच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. 

अश्मित आणि महक यांनी पाच वर्षांच्या नात्यानंतर आता वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांच्या नात्यात काही महिन्यांपूर्वी दुरावा आला असून ते दोघे वेगळे राहात असल्याचे म्हटले जात आहे. अश्मित आणि महक यांनी ब्रेकअप केले असल्याचे महकनेच मीडियाशी बोलताना सांगितले आहे. पण याबद्दल अधिक काहीही बोलण्यास तिने नकार दिला आहे.

अश्मितने देखील या बातमीला दुजोरा दिला असून हे आमचे खाजगी प्रकरण असल्याने याबाबत मला काहीही बोलायचे नाही असे सांगितले आहे. 

अश्मित बिग बॉसच्या घरात असताना वीणा मलिक आणि त्याच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. पण अश्मित वीणावर नव्हे तर महकवर प्रेम करत असल्याचे त्याने अनेकवेळा कबूल केले आहे. या दोघांच्या प्रेमकथेविषयी अश्मितने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि महक गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. अनेक पार्टींमध्ये आम्ही अनेकवेळा भेटलो आहोत. आम्ही एकाच जिममध्ये अनेक वर्षं  जातो. पण आमच्यात केवळ फ्रेंडशिप होती. पण एका दिवशी खूप पाऊस पडत होता. जिममध्ये येताना महकने तिची कार आणली नव्हती. त्यामुळे मी तिला घरी सोडण्याची ऑफर केली. त्यानंतर आम्ही कार्टर रोडवर भुट्टा खायला थांबलो. तिथे बसून आम्ही अनेक तास गप्पा मारल्या. त्याचवेळी आमच्यात मैत्री पेक्षा अधिक काहीतरी असल्याची आम्हाला जाणीव झाली.

Web Title: Ashmit Patel, Mahekk Chahal Call off Engagement, Separate After 5 Years of Relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.