अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडद्यावरील अपूर्वाच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. तिच्या  प्रत्येक भूमिकेचे सर्वत्र कौतुक झालं. अभिनयाप्रमाणेच सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

 अपूर्वा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि मालिकांविषयी तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतेच अपूर्वाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. तिच्या फोटोने तर चाहत्यांचे लक्ष वेधले आहेच पण कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

शेअर केलेल्या फोटोत  पारंपरिक घागरा चोली परिधान केली असून त्यावर विशेष अशी गुजराती कलाकुसरही पाहायला मिळत आहे. तिचा मेकअप गुजराती लूकला चारचाँद लावत असल्याचं दिसत आहे. पारंपरिक अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. शिवाय दागदागिने आणि मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर अपूर्वाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. आजवर अशा अंदाजात  अपूर्वाला आपण ऑनस्क्रीन कधीच पाहिलेलं नाही. हा लूक प्रेक्षकांसाठीही नवीनचं असणारेय.  त्यामुळं एरव्ही वेगवेगळ्या अवतारातून रसिकांवर तिनं जादू तर केलीय.. मात्र आता या गुजराती लूकमधून ती रसिकांच्या काळजाचा ठाव घेते असल्यामुळे हा फोटोही तितकाच खास ठरत आहे. 

अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा

शेवंता या भूमिकेनंतर 'तुझ माझं जमतंय' या सिरीअलमधून पम्मीच्या रुपात आपल्याला दिसली.आता ही मालिका सुरू होऊन काही महिनेच झाले असताना अचानक अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सीएनएक्स फिल्मी टीमशी बोलताना अपूर्वा म्हणाली की, माझ्या पर्सनल रिझनमुळे ही मालिका मी सोडत आहे. एका ब्रेकची मला गरज होती त्यामुळे हा डिसिजन मला घ्यावा लागला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Apurva Nemlekar stuns her fans by Gujrati Traditional Look, But Caption Caught Everyone Attention Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.